■तर पत्रकार चंद्रकांत शिंदे आणि साकराप्पा वाघमारे यांना 'दर्पन जीवन गौरव' पुरस्कार'..!●
■तर पत्रकार चंद्रकांत शिंदे आणि साकराप्पा वाघमारे यांना 'दर्पन जीवन गौरव' पुरस्कार'..!●
अहमदपूर दि.29
राज्यातील जेष्ठ पत्रकार तथा एनडी टिव्ही मराठी चे आऊटपुट एडिटर संपादक माणिक बालाजी मूंडे यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा 'दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार 2024' जाहीर झाला आहे तर स्थानिक पातळीवर पत्रकार म्हणून कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार चंद्रकांत शिंदे(पत्रकार दै.पुण्यनगरी अहमदपूर) व साकराप्पा वाघमारे (पत्रकार दै.पुण्यनगरी जानवळ) यांना 'दर्पण जीवन गौरव पुरस्कार 2024' देवून गौरव करण्यात येणार आहे.
साहित्य संगीत कला अकादमी (महाराष्ट्र)अहमदपूर जि.लातूर च्या वतीने प्रत्येक वर्षी पत्रकारीता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकार /संपादकांना 'दर्पण सेवा गौरव पुरस्कार दिला जातो. शाल-स्मृतीचिन्ह, लेखनी,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे(लातूर),राही भिडे मॅडम(मूंबई),राजा माने (सोलापूर),अशोक सूरवसे (मूंबई),अतुल कुलकर्णी (मूंबई),किरण तारे(मूंबई)यदू जोशी(मूंबई)प्रा.रामेश्वर बद्दर(लातूर) बि.व्ही.मोतीपौळे (लातूर),राजेंद्र हूंजे (संपादक,मूंबई)आदींना हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.
यंदाचे हे एकोनिसावे वर्ष आहे.
तसेच अहमदपूर व चाकूर तालूक्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणा-या दोन जेष्ठ पत्रकारांची प्रत्येक वर्षी पूरस्कार निवड समितीच्या वतीने दर्पण जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.यंदा जेष्ठ पत्रकार चंद्रकांत शिंदे(दै.पुण्यनगरी अहमदपूर) आणि साकराप्पा वाघमारे(दै. पुण्यनगरी जानवळ) यांना हा 'दर्पण सेवा गौरव पुरस्कार 2024' देण्यात येणार आहे.शाल- स्मृतीचिन्ह- मानपत्र पूष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पूर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार मा.रा.कराड, प्रा.एस.एम. कूलकर्णी, अ.ना.शिंदे,उदयकुमार जोशी,संदीप अंकलकोटे,बाबूराव श्रीमंगले, रवीकांत क्षेत्रपाळे,प्रशांत शेटे, सूरेश डबीर,सूधाकर हेमनर, दिनकर मद्देवार,संतोष अचवले, रंगनाथ वाघमारे, रामलिंग तत्तापूरे, भरतसिंह ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे.
हा पूरस्कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ अहमदपूर जि.लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असून माध्यमातील तज्ज्ञ व्यक्तीमत्व असलेले जेष्ठ पत्रकार संपादक माणिक मूंडे यांचे अनमोल असे व्याख्यान याच कार्यक्रमात होणार असल्याची माहिती साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष युवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,गफारखान पठाण,अजय भालेराव,विलास चापोलीकर,प्रशांत जाभाडे,प्रा.अनिल चवळे,भीमराव कांबळे,गणेश मूंडे,सचिन बानाटे,आकाश पवार,गणेश मदने,सय्यद याखूब, आकाश सांगविकर,प्रा.डाॅ.बालाजी कारामूंगीकर, दयानंद वाघमारे,डॉ. बालाजी थिट्टे, संविधान कदम, संतोष गायकवाड, मोहम्मद पठाण,तरबेज सय्यद,शेख मतीन,प्रा.दिपक बेले,शिवाजी भालेराव,गणेश शिंदे,राजू सूर्यवंशी,दिलीप भालेराव, प्रा.उध्दव श्रंगारे, ईश्वर कांबळे, बालाजी मस्के,सय्यद नूर,सय्यद नौशाद,शेख जाबेर,प्रदिप कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0