आ. रमेशआप्पा कराड यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
आ. रमेशआप्पा कराड यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
लातूर दि.३१- कृषीप्रधान भारत देशात कृषीशी निगडित अनेक सणवार साजरे होतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या. यानिमित्ताने लातूर ग्रामीणचे आ. रमेशआप्पा कराड यांनी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज शेतात जाऊन शेतातील देवतांची आणि काळ्या आईची मनोभावे पूजा करून वेळ अमावस्या साजरी केली.
वेळाअमावस्येचे शेतकरी बांधवांच्या जीवनात फार महत्त्व आहे. आपल्यासह संपूर्ण जगाचे पोट भरणाऱ्या आपल्या काळ्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो, रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकाचा 'रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे' अशी प्रार्थना करून शेतकरी आपल्या कष्टाला भरभरून यश मिळावे अशी अपेक्षा करतो. कराड कुटुंबीयांच्या वतीने ही लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील शेतात वेळ अमावस्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लातूर ग्रामीणचे आ. रमेशआप्पा कराड यांनी सुविद्य पत्नी सौ. संजीवनीताई कराड यांच्या समवेत भक्ती भावे पूजा केली व शेतकऱ्यासह सर्वांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी सर्वांनी मिळून स्नेहभोजनाचा आनंद घेतला याप्रसंगी रामेश्वर येथील माजी सरपंच तुळशीराम अण्णा कराड, प्रतिष्ठित शेतकरी काशीराम नाना कराड, डॉ. हनुमंत कराड, राजेश कराड, भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड, पृथ्वीराज कराड, तेजस कराड, सौरभ कराड, दिग्विजय कराड, रणवीर कराड, राजवीर कराड, रघुवेंद्र चाटे, श्रीराम नागरे, देवेंद्र कराड यांच्यासह महिला पुरुष आबाल वृद्ध मित्रपरिवार व इतर अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0