या दिनदर्शिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
या दिनदर्शिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
लातूर दि.१०- भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार मा. रमेशआप्पा कराड यांचे आकर्षक छायाचित्र असलेल्या जनसेवेचा वारकरी २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी भाजपाच्या संवाद कार्यालयात हभप रामकृष्ण महाराज शास्त्री आणि ह भ प नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आ. रमेशआप्पा कराड जनसेवेचा वारकरी २०२५ या वर्षाची दिनदर्शिका अभिमान वायबसे यांनी तयार केली असून या दिनदर्शिकेचे प्रकाशन घरणी येथील आनंदवन आश्रमाचे हभप रामकृष्ण महाराज शास्त्री आणि ह भ प नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, संत गोपाळ बुवा शुगर मिल्स साखर कारखान्याचे चेअरमन राजेश कराड, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर, सामाजिक कार्यकर्ते भारत बरूरे, भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड, रेणापूर तालुका अध्यक्ष अँड दशरथ सरवदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
त्यागमूर्ती प्रयागआक्का कराड यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि कृपाछत्र कराड परिवाराला लाभले त्यामुळेच या परिवारातील अनेक जण जनसेवेसाठी सतत कार्यरत आहेत. अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे कराड परिवार असल्याचे सांगून हभप रामकृष्ण महाराज शास्त्री यांनी असंख्य वारकरी पंढरीच्या पांडुरंगा साठी आहेत तर रमेश आप्पा कराड हे जनसामान्यांची सेवा करणारे वारकरी आहे. देव, धर्म, देश आणि संस्कृती जतन करण्याचे कार्य त्यांच्या हातून अविरतपणे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर ह भ प नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी जनसेवेचे वृत्त हाती घेतलेल्या रमेश आप्पा कराड यांनी मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे नेतृत्व करावे त्यांना उज्वल भविष्य प्राप्त व्हावे असा आशीर्वाद दिला. पत्रकार अरुण समुद्रे आणि भाजपाचे राजेश कराड यांनी आपल्या भावना व्यक्त करून वायबसे यांच्या दिनदर्शिकाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
याप्रसंगी भाजपाचे पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय क्षिरसागर, अमोल पाटील, धनराज बरुरे, संगायो समितीचे लातूर शहर अध्यक्ष शिवसिंह सिसोदिया, रेणापूरचे अध्यक्ष वसंत करमोडे, हभप शंकर महाराज लातूरकर, विवेक बाजपाई, विजय काळे, प्रताप पाटील, ज्ञानोबा भिसे, सुकेश भंडारे, शरद दरेकर, राजकारण साठे, गोपाळ शेंडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी अभिमान वायबसे आणि ऋषी वायबसे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0