बालकांचा शैक्षणिक विकासासाठी माता पालकांची भूमिका महत्त्वाची
बालकांचा शैक्षणिक विकासासाठी माता पालकांची भूमिका महत्त्वाची
माता पालक मेळाव्यात केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर यांचे प्रतिपादन; निपुण महाराष्ट्र अंतर्गत भव्य माता पालक मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
नांदेड - शाळा, कुटुंब आणि परिसरात बालकाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी माता पालकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन शेवडी बाजीराव केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर यांनी केले. ते लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडेगाव येथे निपुण उत्सव महाराष्ट्र २०२४ अंतर्गत भव्य पालक मेळाव्याचे व माता पालक संघाची पुर्नरचना करणे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेवडी केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष अंबूलगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनेगाव बिटाच्या विस्तार अधिकारी सरस्वती अंबलवाड, भेंडेगावचे सरपंच निवृत्ती उदगिरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल कदम, माजी सरपंच दिलीप कदम, ग्रामसेविका पद्मिन जाधव, जि.प.हा.पेनूरचे प्राथमिक पदवीधर शिक्षक चव्हाण सर आणि माता प्रतिनिधी म्हणून गावातील जेष्ठ मोरे ताई हे होते. तसेच सदरील मेळाव्यास शाळेचे मुख्याध्यापक धनेगावकर, सहशिक्षक तेलंग,सौ. ठोळे, व सौ.राठोड अंगणवाडी सेविका कोल्हे ताई व लिंबटकर ताई , स्वयं शिक्षण प्रयोगच्या आरोग्य सखी पोटफळे ताई व मेदगे ताई तसेच लीडर माता, समस्त माता पालक तसेच अन्य माजी मातादेखील आवर्जून उपस्थित होत्या.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरवात झाली.त्यांनंतर सर्व मान्यवरांचे सत्कार तर उपस्थित सर्व मातांना कुंकू-हळद लावून साखर देऊन तोंड गोड करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनेगावकर सरांनी केले. त्यांनंतर लीडर माता पालक मनोगत म्हणून सौ.सुरेखा ताई मोरे यांनी तसेच माता पालक म्हणून सौ.संगीता पोटफळे ताईंनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर श्री.अंबूलगेकर सरांनी सखोल मार्गदर्शन करून निपुण महाराष्ट्र अभियान विषयी जनजागृती केली तसेच माता पालक कशाप्रकारे मुलांच्या अभ्यासात लक्ष देऊ शकतात त्यांना विभिन्न सहजसोप्या कृतींतून मुलांची साक्षरता व गणित कौशल्ये कसे विकसित करता येते याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तदनंतर माता आयडिया व्हिडिओ बद्दल सर्व २० व्हिडिओचे सविस्तर सार सांगत १ते २० व्हिडिओ तीळ काही करून पाहूया ,काही नवीन शिकूया व घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊ या अशा सर्व कृती समजावून सांगण्यात आल्या. त्यांनंतर आयडिया व्हिडिओ तील विचारलेले मनोरंजक प्रश्न विचारून हसत खेळीच्या वातावरणात विचारतो आम्ही सांगा तुम्ही हा खेळ संपन्न झाला.तसेच त्या मजेदार प्रश्नातील दोन मेंदूचा खेळ मोठ्या त्रिकोणातील ३ काड्या उचलून ३ त्रिकोण बनवणे व मोठ्या चौकानातून तीन काड्या उचलून तीन चौकोन बनवणे चा खेळ घेऊन मेंदूला खुराक देत मेळाव्याचा आनंद घेण्यात आला.
त्यानंतर निपुण महाराष्ट्र आयडिया आठवडा व्हिडिओ भाग १ मधील कलाकृती म्हणून गोष्ट सांगणे ही कृती घेताना सौ.शिवराणी भोसले यांनी लांडगा व शेळीची पिल्ले ही गोष्ट तर सौ.सुरेखा मोरे यांनी कावळा व कोल्हा याची गोष्ट सर्वांना सांगितली. त्यानंतर आठवडा व्हिडिओ भाग २ मधील बडबडगीते बालगीते सादर करणे यात शिवराणी भोसले तसेच सर्व मातांनी मिळून सामूहिकपणे घड्याळात वाजला १ ...हे अंकाचे गाणे गायिले व सर्वांनी या गीताचा आनंद घेतला. त्यांनंतर आयडिया व्हिडिओ तील वेगवेगळी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.जास्तीत जास्त दगड गोळा करणे,डोळे बंद करून काठीने सरळ जात बादलीला मारणे,पाठमोरे चालत अंतिम रेषेपर्यंत येणे,छोट्या काडीने बांगडी उचलून ग्लास भोवती अडकवणे,कागदी कपांचा टॉवर म्हणजे मनोरा बनवणे,खड्याची शर्यत ,कागदापासून विमान बनवणे व लांब फेकणे ,वस्तूची लांबी मोजण्यासाठी अंदाजे माचीस च्या काड्या किती लागतील ते अचूक ओळखणे ,अवधान ठेवत उचला रुमाल ,गुपित पिशवीतील वस्तूवर वाक्य बनवणे,सरळ उलट कागडीकप व गोट्या ठेवणे ,बटाटा शर्यत ,कागदी फुले बनवने ,पोत्याची शर्यत /थैला रेस तसेच संगीत खुर्ची अशा विभिन्न आयडिया व्हिडिओ तील 20 खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व मातांनी मनसोक्त सर्वच खेळाचा आनंद घेतला व प्रथम द्वितीय येण्यात चुरस दाखवली .प्रथम द्वितीय येणाऱ्या मातांचे अंबलवाड मॅडम यांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. संबंधित सर्व खेळ घेताना श्री. अंबूलगेकर सरांनी सुद्धा एक मेंदूचा खेळ घेत काड्याच्या माशाची तीन काडी उचलून दिशा उलट करण्याचे मातांना आव्हान दिले ते मातांनी हसत खेळत पूर्ण केले. एकंदरीत सर्व खेळ खेळताना मातांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व सर्व खेळांचा व मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. तदनंतर शेवटी सर्व मातांना आयडिया व्हिडिओ 20 टीव्हीवर दाखवण्यात आला.संपूर्ण मेळाव्यात सर्व मातांसोबत श्री .अंबूलगेकर सर ,धनेगावकर सर ,तेलंग सर ,ठोळे मॅडम ,राठोड मॅडम यांचे विशेष अभिनंदन मेहनत घेतल्याबद्दल .यांनीदेखील मेळाव्याचा भरपूर आनंद घेत मेळावा यशस्वीपणे पार पाडला. शेवटी असेच माता पालक सहकार्याने निपुण भारत -निपुण महाराष्ट्र घडवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प करत आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0