जयक्रांती महाविद्यालयात रंगणार चार जिल्ह्याची विकसित भारत युवा संसद 2025
जयक्रांती महाविद्यालयात रंगणार चार जिल्ह्याची विकसित भारत युवा संसद 2025
लातूर : येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित… जयक्रांती महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय विकसित भारत युथ पार्लमेंट 2025 दिनांक 15 व 16 मार्च 2025 रोजी जयक्रांती महाविद्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा नोंदणी कालावधी दि.27 फेब्रुवारी 2025 ते 9 मार्च 2025 वय दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 असावे अट - माय भारत पोर्टलवर नोंदणी 1 मिनिटांचा व्हिडिओ किंवा व्हिडिओ युट्यूब वर अपलोड करून त्याची लिंक माय भारत पोर्टलवर अपलोड करावी, विषय -What does Viksit Bharat mean to you? भाषा -मराठी, हिंदी, इंग्रजी व्हिडिओ तयार करताना – नाव जिल्ह राज्य पाठीमागे कुठलाही प्रकारचा आवाज नसावा स्पष्ट असा आवाज असावा २५ एम बी पेक्षा मोठा व्हिडिओ नसावा उच्चार स्पष्ट असावेत व्हिडिओ फक्त एकच मिनिटाचा तयार करावा, व्हिडिओ तयार करून माय भारत पोर्टलवर अपलोड करावा अंतिम मुदत 9 मार्च 2025, व्हिडियो फॉरमॅट - mp4,mkv,mov,mpeg,avi,wmv,flv.ही युवा संसद सर्व युवक युवतींना खुली असून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले व महाविद्यालय बाहेरील इच्छुक युवक युवतींना यामध्ये सहभाग घेता येईल. तरी जास्तीत जास्त युवकांनी या युवा संसदेमध्ये सहभाग घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विकसित भारत 2047 या विषयाच्या अनुषंगाने आपणास संवाद साधण्याची संधी युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त युवकांनी या युवा संशोधनात सहभाग घ्यावा असे अवाहन राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालक श्री. अजय शिंदे, संपर्क अधिकारी डॉ. निलेश पाठक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी, आयोजक महाविद्यालयाचे संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार, सदस्य श्री. प्रशांत घार, प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. रामेश्वर स्वामी, यांनी केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0