खुरगावला फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा; महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
खुरगावला फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा; महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड - थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे. थायलंडचे लोक स्वच्छतेला अतिशय महत्त्व देत असतात. त्या ठिकाणावर कोणीही रस्त्यावर किंवा कुठल्याही पाण्यामध्ये काडी कचरा टाकत नाहीत. तेथील जे छोटे मोठे नाले असतील त्या नाल्याचे पाणी सुद्धा आपल्याला एकदम स्वच्छ दिसेल. चायना बीचमध्ये एक रुपयाचा कॉईन टाकला तर तोही आपल्याला ठळकपणे दिसू लागतो. भारतामध्येही स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. थायलंडमध्ये पुरुषांसह महिलाही सक्रिय आहेत. अनेक ठिकाणी भगवान बुद्धांच्या असंख्य मुर्त्या बघायला मिळतात. शुद्ध धम्माच जतन थायलंड येथील बौद्धांनी केलेला आहे. दान पारमिता करुन, शिल पालन करुन आणि व्यसनांना दूर करुन धम्माला गतिमान करायला हवे असे प्रतिपादन इंजि. गंगाधर धुतराज यांनी केले. ते फाल्गुन पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायकराव लोणे, एस एन गोडबोले, शिवराम शिवभगत, दिगंबर धुताडे तहसीलदार झगडे, शेषराव वाघमारे, आप्पाराव नरवाडे आदिंची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परित्राण पाठ, विविध गाथांचे पठण, भोजनदान, बोधीपुजा, धम्मदेसना, दान पारमिता आदी कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर ध्यानसाधना घेण्यात आली. मान्यवरांच्या सत्कारानंतर समयोचित भाषणे झाली. भिक्खू संघानेही धम्मदेसना दिली. उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान देण्यात आले. दान पारमिता मोठ्या प्रमाणावर झाली. त्यानंतर भीम बुद्ध गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक ठिकाणांहून आलेल्या बौद्ध उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हा व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0