डॉ. बरमदे हॉस्पिटल व लातूर स्त्री रोग संघटनेतर्फे आयोजित
डॉ. बरमदे हॉस्पिटल व लातूर स्त्री रोग संघटनेतर्फे आयोजित
हिस्टेरोस्कोपी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : येथील डॉ. बरमदे हॉस्पिटल व लातूर स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिस्टेरोस्कोपी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. एस. कृष्णकुमार यांची उपस्थिती होती.
हिस्टेरोस्कोपी म्हणजे गर्भ पिशवीची अंतर्गत तपासणी करणे व गर्भ पिशवी आजाराचे अचूक निदान करून आजाराचे समूळ उच्चाटन करणे. ही नवीन प्रणाली ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांनी विशेष परिश्रम या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. हिस्टेरोस्कोपी या बिनटाक्याच्या शस्त्रीक्रियेमुळे महिलांचे गर्भाशय संबंधी आजार दुरुस्त करणे खूप सोपे झाले आहे. ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची असल्याने शस्त्रक्रियेनंतर पोटावर कोणताही डाग, वृण पडत नाही. वारंवार गर्भपात होणे, गर्भपिशवीतील गाठी, पडदा , कॅन्सरचे अचूक निदान करणे सहज झाले आहे. या कार्यशाळेत डॉ. एस. कृष्णकुमार यांनी सहभागी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून प्रात्यक्षिक दाखवले. तसेच या शस्त्रक्रियेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल डॉ. कल्याण बरमदे यांचे अभिनंदनही केले. ग्रामीण भागात या अद्यावत उपचार यंत्रणेची आवश्यकता लक्षात घेऊन सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याकामी डॉ. एस. कृष्णकुमार यांना फॅकल्टी म्हणून डॉ. कल्याण बरमदे, डॉ. कृष्णा मंदाडे, डॉ. भाऊराव यादव यांनी तर भूलतज्ज्ञ डॉ. अनिल वलसे यांनी सहकार्य केले.
या कार्यशाळेस लातूर, उदगीर, बीड, धाराशिव, सोलापूर, गुलबर्गा, नांदेड येथील स्त्री रोग तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला व शस्त्रक्रिया बघून प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी लातूर स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ, प्रतिभा पाटील, सचिव डॉ., मनीषा बरमदे , कोषाध्यक्ष डॉ. अनुसया वलसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0