पानगावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. कराड यांनी पालकत्व स्वीकारले
पानगावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. कराड यांनी पालकत्व स्वीकारले
लातूर दि.१०- रेणापूर तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या पानगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या सांगता सोहळ्यात सहभागी झाले याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्व स्वीकारून पानगावकरांनी मतभेद बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी काम करण्याचा मौलिक सल्ला दिला. सप्ताहाच्या निमित्ताने पानगाव आणि परिसरातील बहुसंख्येने भाविक भक्त महिला पुरुष उपस्थित होते.
पानगाव येथील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि हभप महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची जगद्गुरु श्री तुकोबाराय जीवन चरित्र कथा मोठ्या उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात हभप गुरुराज महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन झाले याप्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड हे आवर्जून उपस्थित होते.
अध्यात्माशिवाय प्रगती शक्य नाही असे सांगून सांगता सोहळ्यात बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, जुन्या काळातील हेमाडपंथी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर होत असलेल्या जीर्णोद्धाराचे कामाबाबत समाधान व्यक्त करून मंदिराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या मंदिरामुळे गावची उन्नती, प्रगती होऊन निश्चितपणे सुख, शांती आणि समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही या मंदिरासाठी जे जे करणे गरजेचे आहे ते आपण निश्चितपणे करू अशी ग्वाही देऊन ग्रामस्थांनी आपसातील हेवे देवे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने गावच्या विकासासाठी काम करावे असे आवाहन केले.
पानगाव हे गाव लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून भाजपावर प्रेम करणारे आहे पानगाव आणि परिसराने मला मोठा आशीर्वाद दिला, प्रेम दिले. या गावचा भागाचा विकास करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे सांगून पानगावच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच कायमस्वरूपी निकाली काढू असे बोलून दाखविले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. हभप देगलूरकर महाराज आणि व्यंकटी महाराज फावडेवाडीकर यांचा आ. कराड यांनी यथोचित सत्कार केला. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी हभप कांतु गुरुजी, प्रदीप कुलकर्णी, भागवत सोट, महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, दशरथ सरवदे, चंद्रकांत आरडले, सतीश आंबेकर, चंद्रचूड चव्हाण, ईश्वर गुडे, सुकेश भंडारे, शरद दरेकर, ललिता हनवते, गणेश तूरूप, मारुती गालफाडे, भागवत गीते, कुलभूषण संपत्ते, सतीश कुलकर्णी, रमाकांत संपत्ते, वीरेंद्र चव्हाण, नाथराव गिते, शिलाताई आचार्य यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पानगाव आणि परिसरातील भावीक भक्त महिला पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0