दयानंद कला महाविद्यालयात IQAC च्या समन्वयक पदी डॉ.संतोष पाटील यांची नियुक्ती
दयानंद कला महाविद्यालयात IQAC च्या समन्वयक पदी डॉ.संतोष पाटील यांची नियुक्ती
लातूर: दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रभावी कामकाजाला चालना देण्यासाठी IQAC (इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल ) विभागात दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री.ललितभाई शाह व सचिव मा.श्री.रमेश बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष पाटील व सहसमन्वयक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मच्छिंद्र खंडागळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उप प्राचार्य डॉ.अंजली जोशी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे पर्यवेक्षक डॉ .प्रशांत दीक्षित यांनी डॉ.संतोष पाटील व डॉ.मच्छिंद्र खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात असे प्रतिपादित केले की, वर्षभर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.सामान्यत: या कार्यपद्धतींमध्ये कामाची जबाबदारी अधिक असते. त्यामध्ये पारदर्शकता व सुनिश्चितता आणून दर्जेदार व्यवस्थापनासाठी IQAC हा महाविद्यालयाचा एक महत्त्वाचा घटक असतो. जो महाविद्यालयाच्या सर्व पैलूंमध्ये दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि अखंडित अपग्रेडेशन सुनिश्चित करतो. डॉ. संतोष पाटील व मच्छिंद्र खंडागळे हे दोघेही IQAC ची जबाबदारी निश्चितपणे उत्तम पार पडतील. यात कोणतीही शंका नाही.
IQAC समन्वयकपदी निवड झाल्यानंतर डॉ. संतोष पाटील यांनी असे मत व्यक्त केली, प्रगत अध्यापन, शिक्षण आणि संशोधन अनुभवांसाठी मौल्यवान शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आंतर संस्थात्मक कार्यशाळा आयोजित करून, गुणवत्तेशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे आणि गुणवत्ता मंडळांना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच विविध कार्यक्रम व कार्यक्रमांचे दस्तऐवजीकरण करून गुणवत्ता सुधारणेवर भर देण्याचा प्रयत्न करेन.दयानंद कला उन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी डॉ. संतोष पाटिल व डॉ.मच्छिंद्र खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0