दयानंद शिक्षण संस्थेचा दयानंद गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
दयानंद शिक्षण संस्थेचा दयानंद गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
लातूर: दयानंद शिक्षण संस्थेचा दयानंद गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष श्री. ललितभाई शाह व श्री.रमेशकुमार राठी, सचिव श्री. रमेश बियाणी, संयुक्त सचिव श्री.विशाल लाहोटी संस्थेचे नियामक सदस्य श्री. दीनानाथ भुतडा, श्री.बालकिशन बांगड, श्री.डी एन शेळके, श्री.चैतन्य भार्गव श्री.सागर मंत्री, श्री.कुणाल कोरे व श्री. सुदर्शन भांगडिया तसेच दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी, दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित व कार्यालयीन अधीक्षक श्री संजय व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
दयानंद शिक्षण संस्था मराठवाड्याच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्याचे व्यासपीठ असणारी तसेच गरीब, होतकरू पण हुशार विद्यार्थ्यांना प्रगती करता यावी म्हणून सतत कार्यरत असते. `विद्यार्थी हेच धन' हे ब्रीद मानून विद्यार्थ्यांना दयानंद शिक्षण संस्था शिष्यवृत्ती देऊन त्यांचा मध्ये ऊर्जा देण्याचे काम करते.या गुणवंत विद्यार्थी सोहळ्याचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयातील विविध शाखातील गुणवंत विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक व रोख पारितोषिक मिळवले आहेत. त्यामध्ये बीए तृतीय वर्षामध्ये गाडे वैष्णवी मधुकर ( विद्यापीठात द्वितीय) बीए प्रशासकीय सेवा तृतीय वर्षामध्ये कैले मयुरी नामदेव (विद्यापीठ प्रथम) गुलांगे स्नेहा नागेश (विद्यापीठात द्वितीय)कोंडमगिरे अश्विनी शिवानंद (विद्यापीठात तृतीय), बीए व्होक तृतीय वर्षामध्ये हाटोळे ऋतुजा बलभीम (विद्यापीठात प्रथम), चौंडे ओंकार राजकुमार (विद्यापीठात द्वितीय), बीए ॲनिमेशन तृतीय वर्षामध्ये जाधव शुभम संजय (विद्यापीठात प्रथम) गुंडाळे सागर राजकुमार (विद्यापीठात द्वितीय) जाधव समर्थ संजय (विद्यापीठात तृतीय) बीए फॅशन ड्रेस डिझाईन तृतीय वर्षामध्ये पवार सायली दत्तात्रेय (विद्यापीठात प्रथम) मुळे मानसी चंद्रकांत( विद्यापीठात द्वितीय) पठाण सायमा सादरखा (विद्यापीठात तृतीय) एम ए फॅशन ड्रेस डिझाईन दुतीय वर्षामध्ये कुलकर्णी भाग्यश्री उदयराव (विद्यापीठात प्रथम) आयतनबोने वैष्णवी ज्योतीराम (विद्यापीठात द्वितीय) मुसळे संध्या अर्जुन (विद्यापीठात तृतीय) एम ए मराठी द्वितीय वर्षामध्ये सावंत सुधीर श्रीकांत ( विद्यापीठात प्रथम) सोनार वैष्णवी गोविंद (विद्यापीठात तृतीय) एम ए हिंदी द्वितीय वर्षात खटके सुजाता सुदाम (विद्यापीठात प्रथम) एम ए लोकप्रशासन द्वितीय वर्षामध्ये सरोजा तानाजी (विद्यापीठात प्रथम) कदम निकिता उत्तमराव (विद्यापीठात द्वितीय) एम ए संगीत द्वितीय वर्षामध्ये कुलकर्णी ऋचा रवींद्र (विद्यापीठात द्वितीय ) देव पद्मजा दामोधर(विद्यापीठात तृतीय) जाधव शुभांगी शरद (इंग्रजी ऐच्छिक विषयात बीए प्रथम द्वितीय तृतीय वर्षात सर्वाधिक गुण)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या 23 प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना दयानंद शिक्षण संस्थेकडून एकूण एक लाख 95 हजार रुपयाचे रोख रकमेचे पारितोषिक दयानंद कला महाविद्यालयाला प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गोपाल बाहेती व प्रा. दशरथ ननवरे यांनी केले तर आभार दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0