महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या पुणे येथील 40 व्या संमेलन अध्यक्ष पदी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांची निवड
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या पुणे येथील 40 व्या संमेलन अध्यक्ष पदी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांची निवड
लातूर. येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि वैचारिक साहित्याला वाहिलेल्या विचारशलाका या नियतकालिकाचे संपादक प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांची पुणे येथील एस पी महाविद्यालया मध्ये 26 , 27 आणि 28 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या चाळीसाव्या तीन दिवसीय संमेलना च्या अध्यक्ष पदी निवड झालेली आहे . या संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते होणार आहेpre तर समारोप उप कुलगुरू प्रा डॉ पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे.
प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग, महाराष्ट्र राज्य गॅजेटियर, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश समिती आदी ठिकाणी सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी आठ ग्रंथाचे लेखन व 50 ग्रंथाचे संपादन केलेले आहे. आता पर्यंतचे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये 20 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत बारा संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी व पाच विद्यार्थ्यांना एम फिल पदवी प्राप्त झालेली आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार, फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, प्राचार्य टी एस कडगे आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशन चा पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार आदी 20 ते पंचवीस पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.
या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना महाराष्ट्रातील समकालीन तत्व चिंतन ही आहे. तसेच या अधिवेशनामध्ये प्राध्यापक मे पु रेगे यांचे समग्र तत्त्वज्ञान आणि नीतिमान समाज रचना संत विचार या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेले आहेत तसेच या अधिवेशनात मध्ये डॉक्टर बी आर जोशी यांना घनश्याम दास सोनी जीवनगौरव पुरस्कार, प्राचार्य किरण सावे यांच्या अंतरंगी डोकावताना या ग्रंथा ला उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार आणि लातूरच्या कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिलीप नागरगोजे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या अधिवेशनात महाराष्ट्रसह देश पातळीवरील तत्त्वज्ञान विषयाचे अनेक अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्वज्ञान प्रेमी सहभागी होणार आहेत. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी स प महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसाव्या अधिवेशनाच्या स्थानिक सचिव डॉक्टर रेखा शेरकर आणि महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष मा डॉक्टर सुनील दत्त गवरे ,कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमन बगाडे आणि परिषदेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0