प्रजापिता ब्रहमकुमारी इश्वरीय संस्थेचे संस्थापक ब्रहमाबाबा
प्रजापिता ब्रहमकुमारी इश्वरीय संस्थेचे संस्थापक ब्रहमाबाबा
यांचा ५६ वा स्मृतीदिन आणि विश्व शांती दिवस साजरा
चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
शनीवार दि. १८ जानेवारी २५
प्रजापिता ब्रहमकुमारी इश्वरीय संस्थेचे संस्थापक ब्रहमाबाबा यांचा ५६ वा
स्मृतीदिन आणि विश्व शांती दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विलास
सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी उपस्थित
राहून प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या मुख्यसंचालिका
ब्रम्हाकुमारी नंदा दिदी, उपसंचालिका पुण्या यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन
ऐकले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय संस्थेचे संस्थापक ब्रह्माबाबा यांचा
स्मृतिदिन आणि विश्व शांती दिवस शनीवार दि. १८ जानेवारी रोजी राजयोग
केंद्र, जुना औसा रोड, लातूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी
उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात विलास सहकारी
साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे प्रजापती
ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या मुख्यसंचालिका ब्रम्हाकुमारी
नंदा दिदी, उपसंचालिका पुण्या दिदी यांनी स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर ब्रम्हाकुमारी नंदा दिदी, उपसंचालिका पुण्या दिदी,
सौ. प्रतिभा पाटील कव्हेकर, डॉ. सारीका देशमुख, भुवनेश्वर महाराज,
राजेंद्रप्रसाद माने आदीची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना ब्रहमकुमारी नंदा बहेन म्हणाल्या प्रत्येक मानावातून
देवमानव तयार झाला पाहीजे, श्रेष्ठ आणि आदर्श जीवन तयार करण्यासाठी
सर्वशक्तीमान शक्तीशी आपण जोडलो गेलो पाहिजे. आपण कोण आहोत आणि आपला काय
परीचय आहे, हे ओळखण्यासाठी अध्यात्मिक शक्तीच अनुकरण करायला हव. चांगले
जीवन आणि चांगला मनुष्य होण्यासाठी आपल संचलन करणारी शक्ती ओळखयला हवी.
आज देखील चांगले आईवडील असतील तर चांगली मुले निर्माण होतील म्हणून
स्त्री घडणे महत्वाचे आहे असे सांगून त्या म्हणाल्या, प्रजापिता
ब्रहमकुमारी इश्वरीय संस्थेचे संस्थापक ब्रहमाबाबा यांनी देशातील
स्त्रीशक्ती जागृत करुन त्यांना भव्य कार्य करण्यासाठी प्रेरीत केले असे
सांगीतले.
यावेळी बोलतांना विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव
देशमुख यांनी ब्रह्मकुमारी संस्थेच्या कामाचे कौतुक केले आणि म्हणाल्या,
लातुर येथील प्रजापिता ब्रहमकुमारी इश्वरीय संस्था राजयोग केंद्राच्या
माध्यमतून येथे चांगले कार्य होत आहे. ब्रहमकुमारी नंदा बहेन, पूण्या
बहेन आणि त्यांचे सहकारी निस्वार्स्थीपणे समाजकार्य करीत आहेत. त्यांच्या
सानिध्यात राहून अध्यात्मिक मार्गदशर्न घेऊन आपणही आपले जीवन घडवावे. आज
स्त्री हा महत्वाचा घटक आहे, कारण एक स्त्री स्वताची मुल घडवून घर घडवते
आणि घर घडवून समाज घडविण्यासाठी मदत करते असे यावेळी बोलतांना सांगीतले.
यावेळी सौ. प्रतिभा पाटील कव्हेकर यांनीही मनेागत व्यक्त केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0