छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्यातून भारतीय लोकशाहीचा पाया घातलाशिवव्याख्याते
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्यातून भारतीय लोकशाहीचा पाया घातलाशिवव्याख्याते
लातूर दि. २४ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभे करून भारतीय लोकशाहीचा पाया घालून दिला. शिवचरित्रात भारतीय संविधानिक मूल्ये दिसून येतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. विक्रम कदम (सातारा) यांनी केले.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय क्यू एसी, भाषा कुल, सामाजिकशास्त्रे, राष्ट्रीय सेवा योजना व जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित विस्तार व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते विचारपीठावर आय क्यू एसी समन्वयक डॉ. आनंद शेवाळे, इंजिनीयर राहूल गाडे, श्रीकृष्ण कदम, संपादक उमाकांत उफाडे, पीएसआय रेहमान, जयंती महोत्सव प्रमुख डॉ. डी. आर. भुरे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमात शिवाली मुकडे यांनी स्वागतगीत सादर केले.
पुढे बोलताना प्रा. कदम म्हणाले की, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता, मानवतावाद, बंधुता या मूल्यांचा अभ्यास शिवचरित्रातून करता येतो. छत्रपती शिवरायांना जाती-धर्माच्या चौकटीत न अडकवता शिवरायांनी अठरापगड जातीसमूहातील सर्व मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांचे प्रशासन, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था लोककेंद्रीत होती. शेती, शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक, सर्वसामान्य रयत यांच्याविषयी शिवाजी महाराजांना अत्यंत कळवळा होता. एक आदर्श शासन प्रणाली शिवरायांनी विकसित केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, भारताचे नव्हे तर विश्वाला प्रेरणादायी असे व्यक्तिमत्त्व आहेत असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समरोपात प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, समाजाला जोडायचे असेल तर महामानवाचे विचार कृतीरूपात यायला हवेत. शिवचरित्रातून समतेची न्यायाची, ज्ञानाची प्रेरणा घेतली पाहिजे. लोककल्याणकारी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेवाद्वितीय राजे होत. आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श गिरवावा असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात बेरहाम (ओरिसा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड झालेल्या कु. शिवाली मुकडे आणि कृष्णा धरणे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. रत्नाकर बेडगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ऋतुजा भिसे व शिवाजी मुकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. डी आर. भुरे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता डॉ. मनोहर चपळे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. किसनाथ कुडके, डॉ. विनायक वाघमारे, डॉ. मंतोष स्वामी, डॉ. जितेंद्र देशमुख, डॉ. गुणवंत बिरादार, प्रा.व्यंकट दुडिले, प्रा. देविदास वसावे, डॉ. गीता गिरवलकर, डॉ. श्रीराम भालेराव, डॉ. नयन राजमाने, प्रा सुजाता पाटील, डॉ. राहूल डोंबे, प्रा. मारुती माळी, प्रा. सागर ठाकूर, प्रा. शंकर भोसले, प्रा. भाग्यश्री वाघमारे, प्रा. भाग्यश्री भुजबळ, संतोष येंचेवाड, आनंद खोपे यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0