चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन; संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन; संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नांदेड - समाजामध्ये अनेक विचारधारा प्रसवत असतात. तसेच लोकांमध्ये वेगवेगळ्या समजुती असतात. मात्र, काही लोक तर चुकीच्या गोष्टी समाजात पसरवत असतात. साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून लोकांना योग्य दिशा देण्याचे काम केले पाहिजे. खरे तर वैचारिक प्रबोधनासाठी साहित्य संमेलनाची आवश्यकता असते असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. ते मुदखेड शहरात भरलेल्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम, स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, नपचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, पोलिस निरीक्षक वसंत सप्रे, विस्तार अधिकारी सुरेश पाटील, माजी गटशिक्षणाधिकारी दिलीप सुपे, ओबीसी नेते सटवाजी माचनवार, कोमल जयस्वाल, गोविंदराव नागेलीकर, शंकर राठी, माधव कदम, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी, कवी बी. जी. कळसे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे आदींची उपस्थिती होती.
प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन मुदखेड येथील रणछोडदास मंगल कार्यालयात करण्यात आले होते. साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. यात राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड आणि युनिवर्सल हायस्कूल या शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. ठिकठिकाणी सवाष्ण महिलांनी ग्रंथपूजन केले. उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्वागतगितानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. पुस्तक प्रदर्शन आणि चित्र प्रदर्शनाचेही उद्घाटन झाले. प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर जनसंवाद २०२५ आणि मातोश्री भागाबाई डोंगरे यांच्या पुरस्कारांचे वितरण झाले. तसेच विशेषांक व पुस्तकांचे प्रकाशन झाले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. कदम म्हणाले की, मोबाईलच्या वाढत्या आक्रमणामुळे माणसामाणसातील संवाद तुटत चालला आहे. हा संवाद राहिला तरच माणूस जिवंत राहू शकेल. अन्यथा माणूसकीचा प्रवाह आटून जायला वेळ लागणार नाही. समाजाच्या बोथट होत चाललेल्या संवेदना ताज्या करणे हे साहित्याचे काम आहे आणि जनसंवाद साहित्य संमेलन ते करीत आहे असे ते म्हणाले. निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पांडुरंग कोकुलवार यांनी केले. सूत्रसंचालन कैलास धुतराज तर आभार प्रज्ञाधर ढवळे यांनी मानले. या सत्राच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सत्रात रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
------------------------------------------------------------------------------
...आणि माणसं मला हे कळू लागले...!
-------------------------------------------------------------------------------
स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या मनोगताचा संदर्भ घेऊन खा. चव्हाण म्हणाले की, आग लावणारे लोक समाजात असतात पण साहित्यिक ती आग विझवण्याचे कार्य करतात. यावरून सभागृहात हंशा पिकला. गायकवाड यांनी वामनदादाच्या सांगितलेल्या केस माझे जेव्हा गळू लागले...या ओळींवरही खा. चव्हाण भाजपाप्रवेशाचा उल्लेख न करता त्या संदर्भाने अगदी मिश्किलपणे म्हणाले की, केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा माणसं मला हे कळू लागले. यावरही सभागृहात हंशा पिकला!
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0