साहित्य व्यवहार निखळ आनंदी व प्रामाणिक असावा.*
साहित्य व्यवहार निखळ आनंदी व प्रामाणिक असावा.*
लातूर:- मराठी साहित्याला प्रामाणिक लेखनाची, निखळ मनोरंजनातून आनंदाची आणि तितकीच पुरोगामी विचारांची परंपरा आहे. साहित्य लेखन भाषण,समीक्षण आणि साहित्य कलाकृतीला मिळणारे पुरस्कार हे त्या कलाकृतीच्या गुणवत्तेवर मिळाले पाहिजेत, यामुळेच साहित्य व्यवहार हा खरा प्रामाणिक आणि निखळ आनंददायी ठरतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर व जयक्रांती महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्तपणे छत्रपती संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणीवर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार समारंभ काल जयक्रांती महाविद्यालय लातूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या
प्रतिमापूजनाने झाली.यानंतर प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्तींचा येथोचीत सत्कार करण्यात आला.यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शेषराव मोहिते, प्रमुख पाहुणे लातूर सार्वजनिक बांधकाम महामंडळाचे अधीक्षक अभियंता व 'शून्यातून शंभराकडे' या गाजलेल्या आत्मकथेचे लेखक डॉ. सलीम शेख होते. प्रमुख पाहुणे जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रशांत घार, मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ.जयद्रथ जाधव, मसाप स्वीकृत सदस्य मोहीब कादरी, डॉ.केशव अलगुले व मसापचे सचिव डॉ.दुष्यंत कटारे उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण शब्दकोश समिती सदस्यपदी
माजी प्राचार्य द.मा.माने, विवेक सौताडेकर, ॲड.हाशम पटेल, डॉ.ज्ञानदेव राऊत,
श्रीमती सुरेखा उस्तुर्गे व अनिता येलमटे तर बालकुमार साहित्य उपक्रम समिती सदस्यपदी
रमेश चिल्ले,रसूल पठाण,
रामदास केदार आणि मसाप अभ्यासक्रम समिती सदस्यपदी प्रा.चंद्रशेखर मलकमपट्टे यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणातून डॉ. दुष्यंत कटारे यांनी मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या मागील सहा वर्षाच्या साहित्यिक कार्यक्रमांचा आढावा पाहुण्यांसमोर विशद केला.कवीसंमेलन,शिवार साहित्य संमेलन, व्याख्यानमाला, ग्रंथ प्रकाशन, साहित्य चर्चा उपक्रमातून साहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
सत्कार मनोगतात रामभाऊ तिरूके म्हणाले की, मी साहित्याचा उपासक,रसिक वाचक असून लिहित्या हाताला बळ देण्याचा प्रयत्न करतो. मराठवाडा व अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतले.लातूर जिल्ह्यात साहित्यिक,सांस्कृतिक चळवळीत एकमेकांच्या सोबतीने कार्य करू असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी दिला.तर डॉ.जयद्रथ जाधव यांनी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळी मानवी समाज जीवनाचे भरण पोषण करतात. भरकटणाऱ्या व्यवस्थेला आरसा दाखवत सत्य, नैतिकतेचा आदर्श विचार साहित्यिक देतात. विवेक सौताडेकर म्हणाले की, रामभाऊ तिरूके योग्य कार्याची दखल घेणारे व्यक्तीमत्त्व आहे. लातूर जिल्हा परिषदेचा देवीसिंग चौहाण गुरुजींच्या नावे पुरस्कार ठेवून साहित्यिकाचा सन्मान केला आहे.
प्रशांत घार यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.लातूरत साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांच्या उपक्रमांना माझे सतत सहकार्य राहील.साहित्यिकांना जपण्याचे काम समाजाने केले पाहिजे.साहित्यिक मंडळी रत्ने आहेत असे मनोगत व्यक्त केले.
डॉ.सलीम शेख यांनी मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे.अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिची योग्यता सिद्ध झाली आहे. साहित्याला जात, धर्म नसतो साहित्य हे मानवी दु:खाशी तादात्म्य पावते.मराठी साहित्याचे केंद्र पुणे नसून हा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र आहे.ग्रामीण समाजांमधून मोठ्या प्रमाणात वर्ग लिहितो आहे. म्हणून ग्रामीण समाजाचे प्रतिबिंब अधिक आहे.साहित्याने समाजाशी एकरूप होऊन लेखन करावे.पर्यायी शब्द न मिळणे म्हणजे समृद्ध भाषा असते.आज इंग्रजी शाळेचे फॅड असले तरी मराठी शाळा ग्रामीण मुलांना आकार देतात.हे मी माझ्यावरून सिद्ध केले आहे.अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी साहित्यिकांना आंतररष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहेत.४५० विद्यापीठात मराठी भाषा शिकता येईल.मराठी ग्रंथालये समृद्ध होतील असे विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.शेषराव मोहिते यांनी मराठी साहित्याचा वारसा समृद्ध आहे.मराठी लेखक जे अस्सल लिहितो तेच वाचक वाचतो. साहित्य विश्वात ओळख, परिचय आणि डिजिटल माध्यमाच्या पोस्ट कुचकाम्या ठरतात. अस्सल साहित्य हे अंतिमतः अस्सल असते.पु.ल.देशपांडे,इंदिरा संत, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, उद्धव शेळके, रा.रं बोराडे ही मंडळी आपला लेखन व्यवहार निष्ठेने लिहित होती.समाजाचे वास्तव प्रतिबिंब मांडत होती.समाजाच्या वेदना जाणून लिहिणाऱ्या लेखकावरच वाचक,समाज चर्चा करतो.यांच्या साहित्यावर परिसंवादात होतात.या चर्चा व संवादातून समाजाला दिशा मिळेल.म्हणून साहित्य लेखनाचा प्रपोगंडा न करता शांतपणे समाजाच्या जाणीवा लक्षात घेऊन साहित्यिकांनी तटस्थपणे मांडल्या पाहिजेत.
म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेवर नवनियुक्त सदस्यांनी हे भान ठेवून परिषदेचा वारसा जपावा,असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बी.आर.पाटील,दिलीप अरळीकर, रामराजे अत्राम,इस्माईल शेख, डॉ. भरत देशमुख, डॉ. सतीश यादव, प्राचार्य संजय वाघमारे, डॉ.रणजित जाधव, योगीराज माने, प्रकाश घादगिने, डॉ.संभाजी पाटील, डॉ.बालाजी भंडारे, डॉ.लहू वाघमारे,डॉ.विजयकुमार करजकर,डॉ. अशोक नारनवरे, शिवाजीराव साखरे, डॉ.हनुमंत पवार,दत्ता लोमटे,डॉ.रत्नाकर बेडगे,प्रा.शिवानंद स्वामी, रामदास कांबळे,डॉ.सुशीला पिंपळे, वृषाली पाटील, ऋचा पत्की,डॉ.सुरेखा बनकर,डॉ.मारूती गायकवाड,उषा भोसले, सुलक्षणा सोनवणे,सुनीता मोरे, संजय मुळे,उदय दाभाडे, रमेश हणमंते, विश्वंभर इंगोले, आनंद गव्हानकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे तर आभार रानकवी नरसिंग इंगळे यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0