आत्मनिर्भरतेतून 'विकसित भारत'कडे नेणारा अर्थसंकल्प : भाजपचे प्रदेश प्रवक्ते किशोर शितोळे यांचा विश्वास
आत्मनिर्भरतेतून 'विकसित भारत'कडे नेणारा अर्थसंकल्प : भाजपचे प्रदेश प्रवक्ते किशोर शितोळे यांचा विश्वास
अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार,
प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी -
लातूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा
सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने
जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत
वाढणारा असून त्यांची क्रयशक्ती
उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल हे 140 कोटी भारतीयांच्या
आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विकसित भारताचे
ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ते
किशोर शितोळे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नागरिकांची बचत
वाढून तेच देशविकासाचे भागीदार कसे बनतील, यासाठी विशेष तरतुदी करण्यात
आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लातूर येथील भालचंद्र ब्लड
बँकेच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे लातूर
शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,
जिल्हा सरचिटणीस रवी सुडे, ऍड. प्रदीप मोरे, ऍड. दिग्विजय काथवटे,
मीनाताई भोसले, रागिणी यादव, आबा चौगुले, प्रमोद गुडे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
किशोर शितोळे म्हणाले, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे
चार प्रमुख स्तंभ असून या चारही घटकांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने
महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी
अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. गरीब आणि माध्यमावर्गीयांना सशक्त
करणारा तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे. असा
विश्वासही शितोळे यांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगारनिर्मिती,
एमएसएमई क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक
स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या चार प्रमुख
आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करप्रणाली, शहरी विकास,
खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रांतील
सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शितोळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. प्रारंभी
जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रदीप मोरे यांनी किशोर शितोळे यांचा परिचय करून
दिला. केले. तर जिल्हा सरचिटणीस रवी सुडे यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार
मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0