सविता शिंदे सर्वोत्तम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
सविता शिंदे सर्वोत्तम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
लातूर- सर्वोत्तम राज्यस्तरीय पुरस्कार 2025 सविता सखा हरी शिंदे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव साई ताजी लातूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्रामपंचायत अधिकारी सविता शिंदे यांनी गावचा विकास करत लोकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना जनावरांसाठी 150 गोठे पंतप्रधान आवास योजना घरकुल 50 रमाई आवास योजना घरकुल 70 गावातील गावांतर्गत रस्ते नाली पाईपलाईन जलजीवन अंतर्गत विहीर पाण्याची टाकी पाईपलाईन आरो प्लांट अंगणवाडी दुरुस्ती शिवरस्ते गावातील दिवाबत्ती नालीसफाई सार्वजनिक शौचालय पाणी व्यवस्थापन लोकसभागातून एक घरकुल गावात दिले. सक्षमीकरणासाठी ग्रामसभा महिला सभा महिला बचत गटासाठी व्यवस्था व्यवसायिक प्रशिक्षण फळबाग लागवड पाच अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीर 5 अटल भूजल योजनेतून कामे पर्जन्यमापक गावात बसविले दिव्यांगांना वैयक्तिक निधी वाटप जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम ब्लड डोनेशन कॅम्प असे विविध विकास कामे त्यांनी राबवले आहेत. या कार्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी सौ सविता शिंदे यांना सर्वोत्तम राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार उपजिल्हाधिकारी रोहिणी नरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे सोशल टीमचे उत्तम शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0