करुणा मैत्री हा बुद्धांचा वैश्विक संदेश आहे - पु.भिक्खु आतुरलीय रतन महाथेरो
करुणा मैत्री हा बुद्धांचा वैश्विक संदेश आहे - पु.भिक्खु आतुरलीय रतन महाथेरो
तथागत भगवान बुद्ध हे जगाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी संपूर्ण मानव जातीसाठी वैश्विक संदेश दिलेला आहे. मानवता, शांती, करुणा, मैत्री हे भगवान बुद्धांच्या शिकवणीचे मूळ सिद्धांत आहे आणि म्हणून भगवान बुद्धांची एकूणच सर्व शिकवण मी मानव जातीला भेटलेली एक अमूल्य देणगी आहे, म्हणूनच भगवान बुद्धांची नैतिक शिकवण मानवासाठी वैश्विक संदेश असल्याचे प्रतिपादन पु.भिक्खू आतुरलीय रतन महाथेरो (श्रीलंका) यांनी यावेळी केले.
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त येथील उपासकांच्यावतीने दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी महाविहार सातकर्णी नगर येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रारंभी धम्म परिषदेच्या सकाळच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय बौद्ध महासभेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष एम. एम. बलांडे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मत्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी समता सैनिक दल यांच्या सैनिकाद्वारे सलामी देण्यात आली.
यावेळी बुद्धमूर्ती सहित भिक्खु संघाच्या उपस्थितीमध्ये बौद्ध उपासक उपासिकांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून धम्म मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या धम्म मिरवणुकीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झाली.
यानंतर दुपारच्या उद्घाटकीय सत्रामध्ये महाविहार धम्म केंद्र सातकर्णी नगर, बार्शी रोड, ता. जि. लातूर येथे पु. भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शखाली सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील माजी खासदार पु. भिक्खु अतुरलीय रतन महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्याचे सहकार मंत्री नामदार मा. बाबासाहेब पाटील, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार मा. संजय बनसोडे, औसा येथील आमदार मा. अभिमन्यू पवार, माजी नगराध्यक्ष मा. लक्ष्मण कांबळे या सोबतच विशेष अतिथी म्हणून दिल्लीचे माजी सामाजिक न्याय मंत्री मा. राजेंद्र पाल गौतम, मुरुड येथील पोलीस अधिकारी अशोक उजगिरे, डी. बी. सानप, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, डॉ. एस. पी. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी पूजनीय भिक्खू संघाच्यावतीने उपस्थितांना त्रिसरण पंचशील देण्यात आले.
या नंतर बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सर्व बौद्ध उपासकांच्यावतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक इंजि. अनिलकुमार गायकवाड, अमृतराव सूर्यवंशी, डी. एस. नरसिंगे, सेवा आधार बहुउद्देशीय संस्थेचे विशाल भोपनिकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भिक्खु अतुरलीय रतन महाथेरो म्हणाले की, बौद्ध धम्म उपकारक असणारी जीवन पद्धती आहे. बुद्ध धम्माचा विचार भेद विरहित असल्याने बुध्दाची सामाजिक समता मानव जातीसाठी एक मोठी देणगी आहे. यावेळी विशेष अतिथी राजेंद्र पाल गौतम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे महत्त्व व्यक्त करताना, आंबेडकरी चळवळ ही देशाची मुख्य चळवळ असून तिला वाढवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे सर यांनी केले या प्रसंगी पु. भिक्खु धम्मसेवक महाथेरो, पु. भिक्खु डॉ. यशकाश्य पायन महाथेरो, पु. भिक्खु डॉ. खेमोधम्मो महाथेरो, पु. भिक्खु सत्यपाल महाथेरो, पु. भिक्खु महाविरो थेरो,पु. भिक्खु धम्माणंद थेरो,पु. भिक्खु बोधिधम्मा, पु. भिक्खु पय्यावंस, सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य संयोजक पु. भिक्खु पय्यानंद महाथेरो व पु. भिक्खु आर्या मेत्ता, ई. भिक्खु संघाची मार्गदर्शनपर धम्मदेशना झाली.
या धम्म परिषदेत सातकर्णी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या रात्रीच्या शेवटच्या सत्रामध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध क्रांतीशाहीर सचिन माळी व शीतल साठे यांचा बुद्ध भीम गीताचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी धम्म परिषदेसाठी लातूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, बौद्ध उपासक, उपासिका, तरुण युवा मंडळ, महिला मंडळ सह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सातव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या शेवटी धम्म परिषदेचे ठराव वाचन करून सामूहिक राष्ट्रगीताने धम्म परिषदेचा समारोप झाला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0