सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भीमाशंकर बिराजदार
सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भीमाशंकर बिराजदार
लातूर दि. ०४ जानेवारी
धर्मांध, दांभिक आणि बेगडी वृत्तीच्या लोकांचे वाभाडे काढून सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात क्रांतीची बीजे पेरणारे महात्मा बसवेश्वर हे मानवतावादी संत सुधारक होत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले.
श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालयातील विद्यार्थी अभ्यासिकेतआय. क्यू. एसी. आणि महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेच्या महात्मा बसवेश्वर विद्रोही कवी, समाज सुधारक हे दुसरे विचार पुष्प गुंफताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपीठावर संयोजक डॉ. रत्नाकर बेडगे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अंधारयुग संपवून समताधिष्ठित समाज रचनेची मुहूर्तमेढ रोवली. वर्णभेद, वर्ग, भेदभाव, स्पृश्यशृता, वेद आणि कर्मकांड या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बसवेश्वरांनी बंड पुकारला. चोरी करू नकोस, हत्या करू नकोस, खोटे बोलू नकोस असे सांगतच त्यांनी कायक वे कैलास अर्थात श्रम हाच स्वर्ग ही संकल्पना मांडली. दया हाच खरा धर्म आहे. सदाचार हाच स्वर्ग असून अनाचार म्हणजे नरक आहे. देव सर्वत्र एक आहे असे सांगून मध्ययुगात समाजाची निकोप बांधणी करून सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया आणि नवा प्रयोग महात्मा बसवेश्वरांनी केला असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांच्या सामाजिक सुधारणा क्रांतिकारी स्वरूपाच्या होत्या. त्यांनी पुरस्कृत केलेली आदर्श तत्वे प्रत्यक्ष व्यवहारात व आचरणात आलेली होती. बाराव्या शतकात एवढ्या मोठ्या स्वरूपात धार्मिक व सामाजिक चळवळ बसवेश्वरांनी उभा करून क्रांतिकारक बदल घडून आला असेही ते म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंयोजक डॉ. मनोहर चपळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संगमेश्वर पानगावे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके आणि डॉ. अश्विनी रोडे यांनी केले. तर आभार प्रा. जयश्री पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ. एम. एस. दडगे, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, डॉ. बाळासाहेब गोडबोले, बसवप्रेमी, अभ्यासक, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रसिक श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0