लातूरच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी पक्षाभिनिवेश बाजूला ठेऊन एकत्रित प्रयत्न सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील
लातूरच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी पक्षाभिनिवेश बाजूला ठेऊन एकत्रित प्रयत्न सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील
लोकशाही व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी
विरोधी पक्षाची भुमिका समर्थपणे निभाऊ
आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : शनीवार दि. १४ मार्च २०२५
लातूरच्या विकासाची गती कायम राखण्या सोबतच या जिल्हयातील सांस्कृतिक,
शिक्षण, क्रीडा यासह इतर क्षेत्रातील अनुकरणीय वारसा जपण्यासाठी
पक्षाभिनीवेश बाजूला ठेऊन सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही
राज्याचे सहकार मंत्री, ना. बाबासाहेब पाटील यांनी येथील पीव्हीआर
थियटरमध्ये आयोजित आतंरराष्ट्रीश् चित्रपट महोत्सव शुभारंभनिमीत्त
बोलतांना केले.
विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन
यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे आयोजित तिसऱ्या लातूर
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ शुक्रवार दि. १५ मार्च रोजी
सायंकाळी, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख, सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, माजी मंत्री आमदार संजयज
बनसोडे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, मनपा आयुक्त
बाबासाहेबजी मनोहरे, कृउबा सभापती जगदीशजी बावणे, चित्रपट समिक्षक समर
नखाते, पूणे फेस्टिव्हलचे विशाल शिंदे, अदिती अंकलकोटकर, तंत्रज्ञ सौरंभ
सांगवडेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतर राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेबजी पाटील यांनी या
कार्यक्रमात सहभागी होऊन शुभारंभाचा चित्रपट पाहीला. या प्रसंगी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा देतांना सहकार मंत्री
बाबासाहेब पाटील म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व
इतर मान्यवर नेत्यांनी लातूर जिल्हयाला कायम प्रगतीपथावर ठेवले आहे. माजी
मंत्री अमित विलासराव देशमुख त्यांना मिळालेला वारसा समर्थपणे पूढे चालवत
आहेत. जे जे नव ते ते लातूरला हव या भुमिकेतून कायमपणाने विविध योजना व
विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या त्या सर्व प्रयत्नांना
पक्षअभिनीवेश बाजूला ठेऊन राज्याचा मंत्री म्हणून आपला कायम पाठींबा आणि
सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
लोकशाही व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी
विरोधी पक्षाची भुमिका समर्थपणे निभाऊ
आमदार अमित विलासराव देशमुख
सर्वांनीच सत्ताधारी पक्षात गेले तर लोकशाही व्यवस्थेचा समतोल बिघडेल आणि
ती बाब आपल्या कोणालाच परवडणारी राहणार नाही. त्यामुळे आम्ही आहोत तिथेच
राहून विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे सांभाळणार आहोत. तुमच्यासारख्या
अनेकांना तिकडे सत्ताधाऱ्यांच्या परड्यात गर्दी झाल्यासारखे वाटले तर
आमच्याकडे या त्यामुळे कदाचित आपले पारडे जड होईल आणि तेच सत्ताधारी
बनेल. या बदलासाठी धीर धरण्याची आमची तयारी आहे असे स्पष्ट प्रतिपादन
मांजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या कार्यक्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या राजकीय ऑफरवर बोलताना
केले.
यावेळी बोलतांना मांजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
"जे जे नवं ते ते लातूरला हवं" ही भूमिका माजी मुख्यमंत्री आदरणीय
विलासराव देशमुख साहेब यांची नेहमीच राहिली, त्यांचा तो वारसा जपण्याचाच
एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लातूरला आयोजन करण्यात
आले आहे, जगात नेमके नवीन काय घडते आहे, याचे ज्ञान लातूर व परिसरातील
जनतेला व्हावे त्यातून त्यांना अनेक नवीन गोष्टी शिकता याव्यात ही या
आयोजना पाठीमागची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, ही संस्कृती जपण्याची आणि
पुढे चालवण्याचा या चित्रपट महोत्सव आयोजना पाठीमागचा आणखीन एक उद्देश
असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पूढे बोलतांना ते म्हणाले, दुष्काळ आणि कोरोना महामारीमुळे लातूर
फेस्टिवलच्या आयोजनात खंड पडला आहे. आगामी काळात हा फेस्टिवल पुन्हा
आयोजित करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. शेवटी
चार दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात
येणाऱ्या चित्रपटांनां कलारसिक मंडळींनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे
आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे म्हणाले की, महाविकास
आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक
कार्यमंत्री असताना सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे
तिसरे वर्ष असून कलाप्रेमी सिने रसिकांसाठी ही
अत्यंत आनंदाची बाब असून अभिनयाची कला जोपासली जावी, हा यामागील मुख्य
उद्देश असून लातूर फेस्टिव्हल लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांनी सुरू
केला, पण सध्या त्यात खंड पडला आहे, तो लातूर फेस्टिव्हल पुन्हा सुरू
करावा अशी विनंती करीत या फिल्म फेस्टिव्हलचा लाभ घ्यावा असे आवाहन
त्यानी केले.
यावेळी प्रस्ताविकपर भाषणात बोलताना, पुणे फिल्म फेस्टिव्हलचे संकल्पक व
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर
तसेच सिनेरसिकांचे शब्दसुमनाने स्वागत करून फिल्म फेस्टिव्हल संदर्भात
विस्तृतपणे माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री
लोकनेते विलासराव देशमुख आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी
सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणन केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी
तेथे आवर्जून उल्लेख केला.
यावेळी बोलताना आमदर विक्रम काळे म्हणाले की, या फेस्टिव्हलच्या
माध्यमातून पर्वणी सिनेरसिकांना मुंबई नंतर लातुरात उपलब्ध करून देण्यात
आली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0