मराठी भाषा विद्यापीठ, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांची निवड !
मराठी भाषा विद्यापीठ, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांची निवड !
लातूर: दयानंद कला महाविद्यालयातील मराठी
विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनिता सांगोले यांची माननीय कुलपती श्री. सी.पी राधाकृष्णन महोदयांनी महाराष्ट्र मराठी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. प्रोफेसर डॉ. सुनिता सांगोले दयानंद कला महाविद्यालय, लातूर या मराठी पदव्युत्तर व संशोधन विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मराठी साहित्य व भाषा विज्ञानाच्या अभ्यासक असलेल्या डॉ. सुनीता सांगोले यांची आजवर १० पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत. तर विविध संशोधनपर नियतकालीकांतून त्यांचे ४३ शोधनिबंध प्रकाशीत झाले आहेत. गेली २५ वर्षे अध्यापन- संशोधन क्षेत्रांत आपले योगदान देत असलेल्या प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांनी भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण समित्यांवर कार्य केले आहे. गुलबर्गा विद्यापीठ, गुलबर्गा; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठांतून मराठी अभ्यासमंडळ सदस्य; विविध विद्यापीठांतून अभ्यास मंडळ, प्राध्यापक निवड समिती, परीक्षा मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. एक चांगली वक्ता, प्रभावी संवादक, संशोधक आणि कवयित्री म्हणून लौकिक असलेल्या डॅा. सुनीता सांगोले यांच्या व्यवस्थापन परिषदेवरील निवडीबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा.अरविंदरावजी सोनवणे, मा. रमेशकुमारजी राठी, व मा.ललितभाई शाह, सचिव मा.रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. विशालजी लाहोटी, सहाय्यक सचिव मा.श्री. अजिंक्य सोनवणे, कोषाध्यक्ष मा.संजयजी बोरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, नवनियुक्त उपप्राचार्या डॉ.अंजली जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप नागरगोजे,पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दीक्षित, स्टाफ सचिव प्रा.सुरेश क्षीरसागर, कार्यालयीन अधिक्षक श्री. संजय व्यास सर्व विभागाचे प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0