सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी खेळ खेळणे आवश्यक
सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी खेळ खेळणे आवश्यक
जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे मत; विश्वमैदान क्रीडा महोत्सव २०२५ बक्षीस वितरण
लातूर, दि. ६ - खेळामधून नेतृत्वगुण, सहकार्य आणि स्पर्धात्मकता यांचा विकास होतो. खेळ आपल्याला शिस्त, सहनशक्ती, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकवतात. खेळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज कोणत्यातरी खेळात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. जगन्नाथ लकडे यांनी केले.
माईर एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालय, एमआयओ ऑप्टोमेट्री महाविद्यालय व प्रयाग कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी शिक्षण संकुल येथे आयोजित विश्वमैदान २०२५ आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोतल होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड हे होते. यावेळी लातूर तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. यतिश कुमार जोशी, एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, प्रयाग नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. सुमती, सल्लागार आशा फुंदे, संयोजक डॉ. वर्षा सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष कृतीमधून शिकणे अधिक प्रभावी ठरते. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळावेत. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती सह आत्मविश्वासही वाढतो, असे सांगून यावेळी पुढे बोलताना जगन्नाथ लकडे म्हणाले की, एमआयटी शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना नव शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृती आणि आध्यात्माची शिकवन देणारी एकमेव संस्था आहे. विश्वमैदान २०२५ क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्द्ल शुभेच्छा देवून भविष्यात या स्पर्धेला लातूर जिल्ह्यातील आंतर महाविद्यालयीन स्वरूप द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, खेळ विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम व खेळ खेळावेत. केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता मैदानी अनुभवातून शिकावे. खेळामुळे मैत्री, नेतृत्वगुण व एकमेकांच्या संस्कृतीची ओळख होते. येत्या काळात विश्वमैदान क्रीडा स्पर्धेस अधिक व्यापक स्वरूप देण्यात येईल व या स्पर्धेला पुढे विद्यापीठ पातळीवर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यानंतर विविध खेळातील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये पुरुष व महिला ‘बेस्ट स्पोर्ट्स पर्सन’, उत्कृष्ट पंच, कर्मचारी सन्मान अशा विविध पुरस्कारांचा समावेश होता. सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दंत महाविद्यालयाला विजयी चषक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विविध महाविद्यालयांचे जनरल सेक्रेटरी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला दंत महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी रुषील पताळे यांनी खेळांमधून मिळालेल्या अनुभवाबद्दल सांगितले. त्यानंतर फिजिओथेरपी कॉलेजचे जनरल सेक्रेटरी चैतन्य पांचाळ, नर्सिंग कॉलेजचे जनरल सेक्रेटरी सोमनश शिंदे आणि शशांक सांगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्पर्धा संयोजक डॉ. वर्षा सांगळे यांनी चार दिवस चाललेल्या विश्व मैदान क्रीडा महोत्सवाचा आढावा सादर केला. यामध्ये मैदानी खेळांमध्ये खो-खो, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल व थ्रोबॉल यांचा समावेश होता, तर इनडोअर खेळांमध्ये बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम व टेबल टेनिस खेळवले गेले, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.डी.एस. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनी पुजा जगदाळे, कृतिका आष्टेकर, प्रिती, आदिती पाठक यांनी केले. आभार डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0