स्वातंत्र्य हे मूल्य प्रा. कुरुंदकर यांची जीवननिष्ठा
स्वातंत्र्य हे मूल्य प्रा. कुरुंदकर यांची जीवननिष्ठा
प्रा. कुरुंदकर यांनी नेहमीच स्वातंत्र्य या मूल्याचा पुरस्कार केला. समाजातील सर्वांना स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणजेच स्वातंत्र्य हे मूल्य त्यांच्या जीवननिष्ठेचा अविभाज्य भाग होते असे प्रतिपादन तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी आज येथे केले.
भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने 'प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या विचारातील सांवैधानिक मूल्ये' या विषयावर एक विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात पाचवे पुष्प गुंफताना 'प्रा. नरहर कुरुंदकर यांचे स्वातंत्र्यविषयक विचार' या विषयावर ते बोलत होते.
आपल्या विवेचनात प्राचार्य डॉ. कुंभार यांनी प्रा. कुरुंदकर यांना अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याच्या आशयाची सविस्तर चर्चा केली. मानवी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांच्या विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता आहे असा आग्रह प्रा. कुरुंदकर यांनी कायमच धरला होता. स्वातंत्र्यामुळेच समाजाची वैचारिक आणि सांस्कृतिक उंची वाढते अशी देखील त्यांची धारणा होती. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आणि मानवी वर्तनाला काही बंधने आवश्यक आहेत असेही प्रा. कुरुंदकर यांचे म्हणणे होते. काही मंडळींकडून स्वातंत्र्याचा दुरुपयोग होतो हे देखील त्यांना मान्य होते. मात्र त्यामुळे स्वातंत्र्याचा संकोच करणे समर्थनीय ठरत नाही असेही ते म्हणत असत असेही प्राचार्य डॉ. कुंभार म्हणाले.
प्रा. कुरूंदकर यांना स्वातंत्र्याची जी संकल्पना अभिप्रेत होती त्यावर उदारमतवाद, मार्क्सवाद आणि गांधीवाद या विचारसरणीचा प्रभाव होता असे प्राचार्य डॉ. कुंभार यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. म्हणूनच समाजातील सर्वांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता यायचा असेल तर त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणे ही त्याची पूर्व अट होय. यासाठी समाजाची अर्थरचना बदलणे आवश्यक ठरते अशीच त्यांची धारणा होती. तसेच प्रा. कुरुंदकर यांनी स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांची देखील सांगड घातली. किंबहुना कर्तव्यभावना आणि जबाबदारी याशिवाय स्वातंत्र्य असूच शकत नाही अशी मांडणी त्यांनी केल्याचे प्राचार्य डॉ. कुंभार यांनी दाखवून दिले.
डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच वक्त्यांचा परिचय करून दिला. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. श्रीनिवास पांडे यांनी स्वागत केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0