विश्र्वशांती बुद्ध विहार जवळा येथे फाल्गुन पौर्णिमा उत्साहात साजरी.
विश्र्वशांती बुद्ध विहार जवळा येथे फाल्गुन पौर्णिमा उत्साहात साजरी.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती.
नांदेड प्रतिनिधी: नांदेड दक्षिण मतदार संघातील तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या जवळा देशमुख येथील विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा तथा तालुका पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थित होती.
सविस्तर वृत्त असे की विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी मागील पाच वर्षापासून प्रत्येक पौर्णिमा अतिशय हर्ष उल्हास मध्ये साजरी करण्यात येत असते प्रत्येक पौर्णिमा ही सामुदायिक न करता एका घराला एक पौर्णिमा संयोजक याप्रमाणे अविरतपणे सुरू आहे या वेळचे संयोजक उपा रमाबाई रोहिदास गोडबोले आणि उपा सारिका अरविंद गोडबोले यांच्या परिवाराकडून साजरी करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस रत्नाकर महाबळे, सचिव आनंद पुरभाजी गोडबोले, जिल्हा संघटक लोहा तालुका प्रभारी सुभाष खाडे, लोहा तालुका अध्यक्ष बापुसाहेब कापुरे, लोहा सरचिटणीस तथा केंद्रीय शिक्षक धोंडिबा यानभुरे, लोहा तालुका संरक्षण सचिव तुकाराम खिल्लारे, लोहा तालुका संघटक रमेश गोडबोले, व समता सैनिक दलाचे सैनिक गुणवंत गच्चे, रवीकांत गच्चे, ऐहलाजी गोडबोले, केशव गोडबोले, सुरेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि परमपुज्य बौध्दीसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप व धुप पुजा पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर संयोजक उपा रमाबाई रोहिदास गोडबोले आणि उपा सारिका अरविंद गोडबोले यांच्या परिवाराने सामुदायिक वंदना घेताना पुजेचा मान मिळविला.
यावेळी केंद्रीय शिक्षक यानभुरे यांनी सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका व बालक बालिका यांना गोडबोले परिवारासह पवित्र असं परित्राण दिले. त्यानंतर फाल्गुन पौर्णिमेविषयी माहिती सांगितली.आणि या पौर्णिमेला
बुद्ध कपिल वस्तू या जन्मगावी बुद्धत्व प्राप्तीनंतर भेट दिली. व येथे गेले असता बुद्धानी चारिका करुन बुद्धत्व पाळले.तर राजा शुध्द़ोधन यांनी भोजनदान देवुन राजस्व पाळले. अशी माहिती उपासक उपासिका यांना देण्यात आली.
त्यानंतर आशिर्वाद गाथेने सर्वाप्रती मंगल कामना व्यक्त केल्या. समता सैनिक दलाच्या जवानांचा सन्मान रोहिदास गोडबोले यांच्या परिवाराकडुन करण्यात आला.यावेळी भिमराव गोडबोले, कैलास गोडबोले, पुरभाजी गोडबोले, पांडुरंग गच्चे, मिलिंद गोडबोले, वसंत गोडबोले, बाबुराव गोडबोले, मुकुंद गोडबोले, यांच्यासह गावातील श्रध्दावान बौद्ध उपासक उपासिका व बालक बालिका आणि पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. त्यानंतर भोजनदान खिरदान सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना केले.आणि सरणदय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0