महात्मा बसवेश्वरमध्ये रंगली प्राचार्य, प्रमुख मान्यवर, प्राध्यापक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांची कविता आणि गझलांची रंगतदार आणि सदाबहार काव्य मैफिल.
महात्मा बसवेश्वरमध्ये रंगली प्राचार्य, प्रमुख मान्यवर, प्राध्यापक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांची कविता आणि गझलांची रंगतदार आणि सदाबहार काव्य मैफिल.
लातूर दि. २८
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर IQAC, मराठी भाषा व वाङ्मय विभागातर्फे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता आणि गजलांची रंगतदार व सदाबहार मैफिल आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते. तर विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील सुप्रसिद्ध कवी तथा अभियंते राहूल गाडे, कृष्णा कदम, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोहर चपळे, डॉ. सदाशिव दंदे डॉ. यशवंत वळवी, प्रा. रमेश तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. मराठी विभागाच्यावतीने आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता असलेल्या 'अस्मिता' या मराठी भाषा गौरव दिन'- काव्यविशेषांकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी राहूल गाडे यांनी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमात पहिलं पुष्प विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘चल जरा शिवराय समजून घेऊ’ या कवितेने गुंफलं. त्यानंतर त्यांनी ‘रायगडा तू किती नशीबवान, म्हणून म्हणतो दादा रोखूया हे खाजगीकरण’ अशा कविता सादर करून प्रेक्षकांची मनसोक्त दाद मिळविली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, माणसाने भाषा घडविली आणि भाषेने माणूस घडविला. आपण भाग्यवान आहोत मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. आज मराठी भाषा जगभर बोलली जाते. त्यामुळे आपण आपले दैनंदिन व्यवहार आपल्या मातृभाषेतच करावेत. अभिजात भाषेचे लेणे ल्यालेल्या आपल्या भाषेचा आपण अभिमान बाळगावा.
या काव्य मैफिलीत डॉ. नयन राजमाने-भादुले, कु. साक्षी घोडके, कु. अवंतिका यादव, कु. शिवाली मुकडे, प्रशांत सुरवसे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. रमेश तडवी, डॉ. अश्विनी रोडे, डॉ. भाऊसाहेब पुरी, श्री भालचंद्र स्वामी, प्रा. सागर ठाकूर, प्रा. शिवचंद्र स्वामी, प्रा. शंकर भोसले, प्रा. सुरेंद्र स्वामी, प्रा. सुशील कांबळे, प्रशांत सुरवसे आदी निमंत्रित कवी- कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या.
या काव्य मैफिलीतून महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा अनुक्रमे प्रथम- अवंतिका यादव (७०० रु), द्वितीय - साक्षी घोडके(५०० रु), तृतीय - प्रशांत सुरवसे (३०० रु) यांना प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शंकर भोसले व शिवाली मुकडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. सागर ठाकूर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. मारुती माळी, डॉ. किरण शिंदे, डॉ. संगमेश्वर धाराशिवे, डॉ. श्रीराम भालेराव, आनंद खोपे, संतोष येंचेवाड, बालाजी डावखरे, कृष्णा कोळी, छायाचित्रकार महेश स्वामी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0