जयक्रांती महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळा संपन्न
जयक्रांती महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळा संपन्न
युवतींनो गरिबीची लाज न बाळगता जिद्द आणि मेहनतीने नेतृत्व सिद्ध करा : मा. सक्षणा सलगर
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयक्रांती महाविद्यालयती राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठस्तरीय युवती नेतृत्व विकास कार्यशाळा 2024-25 दि. 10 ते 12 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या युवती कार्यशाळेत विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून 120 मुलींनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचा समारोप समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा मा. सक्षणा सलगर यांची उपस्थिती होती यावेळी मंचावर संस्थेचे कार्यकारी संचालक व जयक्रांती ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. प्रशांत घार, शहराध्यक्ष राजा मणियार, तालुका अध्यक्ष बक्तावर बागवान, युवती शहराध्यक्ष कल्पना फरकांदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले, कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रमोद चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ. संगीता घार यांचे प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की समाजात अनेक युवती गरिबीचे कारण दाखवून नेतृत्व सिद्ध करण्यापासून दूर जातात. युवतींना आव्हान आहे की आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी गरिबीचे भांडवल न करता त्यावर मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात यशाच्या उंच शिखरावर आपण जावं आणि आपला नेतृत्व विकास करावा आपले दुःख पुसण्यासाठी कुणाचीही वाट न बघता, आहे त्या परिस्थितीवर मात करून मेहनत, जिद्द, कष्ट, वाचन आणि व्यासंग वाढवून आपल्या मधला नम्रपणा कधीही न ढळू देता प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवावा. या समाजामध्ये वाट अडवणाऱ्यांची संख्या भरपूर आहे परंतु आपले व्यक्तिमत्व असे बनवा की आपल्या वाटेवर कोणीही उभा टाकण्याची हिम्मत ठेवू नये. यशाच्या उंच शिखरावर गेलेले अनेक लोक स्वतःच्या कर्तुत्वावर मोठी झालेली आहेत. जगामधील वेगवेगळ्या क्षेत्रात यशाच्या उंच शिखरावर गेलेल्या महिलांचा आदर्श घेऊन आपले व्यक्तिमत्व सिद्ध करावे अशी मत यावेळी व्यक्त केले. प्राचार्य प्रशांत घार म्हणाले की आपल्या बोलण्यामधून, वागण्यामधून आपल्या नेतृत्वाला नाव ठेवण्याची संधी कोणाला देऊ नका, आई-वडिलांचा आदर करा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, युवतीनी मोबाईलचा वापर साधन म्हणून करावा, मोबाईल हा आपले मनोरंजन करू शकतो परंतु दुःख पुसण्याचे काम करू शकत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचे असेल तर कॉपी-पेस्ट प्रवृत्ती दूर ठेवून स्वतःमध्ये नवनिर्माणाची क्षमता विकसित करावी असे आवाहन यावेळी केले. अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे म्हणाले की, यशाच्या उंच शिखरावर गेलेले 90% लोक हे प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या बळावर मोठी झालेली आहेत. ज्याच्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची धमक आहे त्याचे व्यक्तिमत्व सिद्ध करण्यात कुणीही अडथळा आणू शकत नाही. भारतीय संविधानाणे सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे आवाहन केले. महाविद्यालय पातळीवरून युवतींना नेतृत्व विकासासाठी अनेक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या संधीच सोन करावं असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद चव्हाण, सूत्रसंचालन डॉ. केशव आलगुले आभार प्रा. प्रज्ञा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गीता वाघमारे, डॉ. समिना शेख, डॉ. रामेश्वर स्वामी, प्रा.प्रज्ञा स्वामी, प्रा. प्रज्ञा कांबळे, प्रा. प्रकाश भिंगे, प्रा.शिवराज बाजुळगे, डॉ.राजेश करंजकर, डॉ. राजाभाऊ पवार, डॉ.हरिश्चंद्र चौधरी, डॉ.अविनाश पवार,जाधव रामदास, सय्यद इब्राहिम, अमित भालके यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0