युवकांची बदलती मानसिकता" या विषयावरती मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
युवकांची बदलती मानसिकता" या विषयावरती मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
लातूर : दि.21.01.2025 रोजी लातूर, येथील दयानंद कला महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळ व महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने "महाविद्यालयीन युवकांची बदलती मानसिकता" या विषयावरती मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स च्या अध्यक्ष ॲड. सौ. जयश्री पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड तसेच महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्सच्या प्रतिनिधी ॲड. पल्लवी कुलकर्णी अभिलाषा गवारे सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाचे समन्वयक डॉ.रामेश्वर खंदारे व मंडळाचे अध्यक्ष त्रिमुख इगवे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डिजिटल सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख वक्त्या एडवोकेट जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वच्छंदी, संयमी वृत्तीने जीवनातील यशाकडे वाटचाल करावी, आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध तात्काळ दाद मागावी असे मौल्यवान मार्गदर्शन केले.
तसेच ॲड. पल्लवी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी रस्ते वाहतूक सुरक्षा कायद्याचे पालन करावे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा . डॉ शिवाजीराव गायकवाड यांनी सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे फुलवता येईल. आपल्या विद्यार्थी अवस्थेतील गुणांना वाव कसा द्यावा याबद्दल मार्गदर्शन केले व कुटुंब प्रेम हे विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाचा पाया आहे याबद्दल अनेक उदाहरणं मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा.डॉ. रामेश्वर खंदारे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू ,धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थ सेवन करीत आहे. तसेच मोबाईलच्या अधिक आहारी गेल्यामुळे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे.विद्यार्थ्यांना यापासून वेळीच सावध करणे, त्यांच्यामध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष त्रिमुख इगवे,
वसंत कुलकर्णी, दीपिका यादव, अजिंक्य आदमाने, मुदाळे कामाक्षा, अर्णव पाटील, देवांश पाचंगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा मोरे तर आभार दीपिका यादव या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा.चैतन्य शिंदे, प्रा. समुद्रे स्फूर्ती व प्रा. धायगुडे अश्विनी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0