दवणगावचे सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश
दवणगावचे सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश
दवणगावचे सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांचा
आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश
लातूर दि. ३१ - भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेणापूर तालुक्यातील मौजे दवणगाव येथील सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांनी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध गावात विशेषता रेणापूर तालुक्यातील मौजे दवणगाव येथे विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला अनेक विकास कामांना गती मिळाली शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजना गरजू आणि पात्र बहुसंख्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला.
दवणगाव येथे सध्या होत असलेली विकास कामे लक्षात घेऊन आणि भविष्यात या कामांना अधिक गती मिळावी याकरिता भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह अनेकांनी लातूर येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, विधी आघाडीचे मनोज कराड, तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, मुरढवचे सरपंच लक्ष्मण यादव, घनसरगावचे शरद दरेकर, दवणगावचे श्रीमंत नागरगोजे, सांगवीचे परमेश्वर जाधव, गुणवंत जोगदंड, बावचीचे नरेश चपटे, संतोष चव्हाण यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सरपंच रवींद्र नागरगोजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रविकांत सुग्रीव नागरगोजे, उध्दव ग्याना नागरगोजे, किशन माणिक नागरगोजे, मुकुंद शंकर नागरगोजे, महादेव रंभाजी नागरगोजे, राम बलभीम काळसे, शिवाजी अंगद नागरगोजे, नागनाथ नागरगोजे, विभिषण बालासाहेब नागरगोजे, बाळासाहेब नागरगोजे, चंद्रकांत सोपान पाचाळ, दुर्गादास माने, भास्कर मधुकर नागरगोजे, अर्जुन सोपान नागरगोजे, व्यकटी सुग्रिन नागरगोजे, रंगनाथ हनुमंत मुंडे, ओम नागरगोजे व इतर अनेकांनी भाजप नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0