डॉ.अंजली जोशी टेंभुर्णीकर यांची दयानंद कला महाविद्यालयाच्या उप प्राचार्यपदी नियुक्ती
डॉ.अंजली जोशी टेंभुर्णीकर यांची दयानंद कला महाविद्यालयाच्या उप प्राचार्यपदी नियुक्ती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .शिवाजी गायकवाड यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या डॉ. अंजली जोशी टेंभुर्णीकर या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे व्यक्तिमत्व असून; त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत . त्या गेल्या 28 वर्षापासून दयानंद कला महाविद्यालयामध्ये कार्यरत असून त्यांच्या 'असंघटित क्षेत्रातील बालकामगार' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे, 50 पेक्षा अधिक चर्चासत्र आणि परिषदांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन केले आहे. अनेक कार्यशाळांमधून मार्गदर्शक आणि प्रमुख म्हणून त्या उपस्थित राहिल्या आहेत . त्यांनी आजपर्यंत दहा पुस्तकांचे लेखन केले आहे. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड उपप्राचायॅ डॅा दिलीप नागरगोजे पर्यवेक्षक डॅा.प्रशांत दिक्षीत कारयालयीन अधिक्षक संजय व्यास व सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व डॉ. अंजली जोशी टेंभुर्णीकर यांनी उपप्राचार्यापदाचा कार्यभार स्वीकारला.
उपप्राचार्य पद स्वीकारताना डॉ. अंजली जोशी टेंभुर्णीकर आपल्या मनोगतात असे म्हणाल्या की, दयानंद शिक्षण संस्थेने माझ्यावर टाकलेला विश्वास आणि मला दिलेली कार्याची जबाबदारी मी यशस्वीरित्या पूर्ण करेन.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0