सम्राट मित्र मंडळाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
सम्राट मित्र मंडळाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
अहमदपूर दि.28
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड ची घटना घडली आणि त्याचे पडसाद सबंध देशभर उमटले प्रसंगी या घटनेत एका भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याला न्याय मिळावा म्हणून देशभर मोर्चे आंदोलने होत असतानाच पुन्हा एकदा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंजाब राज्यातील अमृतसर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका माथेफिरूने तोडफोड करून विटंबना केली आणि पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे दि.२८ जानेवारी रोजी सम्राट मित्र मंडळ सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून अहमदपूर तहसीलदारांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अमृतसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व राज्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या रक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी या निषेध मोर्चात सहभागी असलेल्या आंबेडकर अनुयायांना एकजुटीने लढा उभारून अशा घटना रोखल्या पाहीजेत असे आवाहन केले.
या निषेध मोर्चासाठी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेकडो आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.यात प्रामूख्याने माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,रिपाई तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाघंबर,माजी नगरसेवक शेषराव ससाणे,भगवानराव ससाने,शेख चांद सौदागर,सचिन बानाटे, आकाश पवार,अँड.अजय बनसोडे, मिलिंद कदम, रितेश रायभोळे, युवराज गायकवाड,बजरंग गायकवाड, बाळू गुळवे, सचिन वाघमारे, बाळू आमले,अण्णाराव सूर्यवंशी, अतुल हनुमंते,प्रकाश लांडगे, संविधान कदम, कमलाकर गायकवाड, ,राणी गायकवाड, सुनिता कदम, गवळणबाई मोरे,पूजा वाघमारे,पल्लवी वाघमारे, शोभाबाई पवार, माया कांबळे मिलिंद कदम, दिलीप भालेराव, संभाजी भालेराव, सुधीर जोंधळे, भरत तलवारे,अमोल मोरे, प्रकाश लांडगे,अनिल पवार, शिवाजी ढवळे, सुमित कांबळे, संभाजी भालेराव, बाळू जंगले, किरण वाघमारे, वैभव बोडके, प्रभास कसादे, आकाश व्यवहारे,चंद्रकांत कांबळे,सूर्यकांत कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0