आ. विक्रम काळे यांचे शिक्षकांना आवाहन
आ. विक्रम काळे यांचे शिक्षकांना आवाहन
लातूर : आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून देशाला बलशाली बनवावे, असे आवाहन शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणेच्यावतीने लातूर येथे आयोजित मुख्याध्यापकांच्या ६१ व्या राज्यस्तरीय दोन दिवशीय शैक्षणिक संमेलनानिमित्त क्रीडा संकुल येथून लोकनेते विलासराव देशमुख नगरी, थोरमोटे लॉन्स, औसा रोड, लातूर या संमेलनस्थळापर्यंत शुक्रवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून आ. काळे बोलत होते. शोभायात्रेत शहरातील विविध शाळांमधील लेझीम पथक व स्काऊट व गाईडच्या पथकातील जवळपास दीड हजार विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.
यावेळी शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब आवारे, राज्याध्यक्ष के. एस. डोमसे, संमेलनाध्यक्ष बाबूराव जाधव, कार्याध्यक्ष हणमंत साखरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख, संस्थाचालक संघटनेचे कोषाध्यक्ष तथा शोभायात्रेचे संयोजक प्राचार्य डी. एन. केंद्रे, वसंत पाटील, बजरंग चोले, शिवराज म्हेत्रे, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक दत्तात्रय मठपती, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजीव मुंढे, मदन धुमाळ, शिवकांत वाडीकर आदींची उपस्थिती होती. राजीव मुंढे यांनी सूत्रसंचालन करून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0