45 पंतप्रधान आवास योजनेचे काम पुर्ण
45 पंतप्रधान आवास योजनेचे काम पुर्ण
चाकुर ता.प्रः-चाकुर शहरातील नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात रीतसर अर्ज सादर करावे असे आहवान चाकुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कपील माकणे यांनी केले आहे.शहरातील पाञ असलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेसाठी शासनाच्या वतीने घर बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.जेणेकरून नागरिकांना निवारा करण्यासाठी पक्के घर बांधकामासाठी नागरिकांनी आपले अर्ज नगरपंचायत मध्ये सादर करावे.
चाकूर नगर पंचायत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०
जाहीर आवाहन प्रधान मंत्री घरकुल योजनेसाठी चाकूर नगरपंचायत शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० साठी नवीन अर्ज स्विकृती चालु झाली आहे. तरी सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह नवीन घरकुलाचा प्रस्ताव नगर पंचायत कार्यालय, चाकूर येथे प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे जमा करावा.
आवश्यक कागदपत्रे
१. लाभार्थी आधारकार्ड (मोबाईल लिंक असणे आवश्यक), पॅन कार्ड, मतदान कार्ड.२. घरातील सर्वांचे आधारकार्ड आई-वडिलाचे.३. चालु वर्षाचे तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र. ४. जागेचे खरेदीखत/PR कार्ड/कबालनामा. ५. जागेचा नमुना 8 अ.६. टॅक्स पावती-घरपट्टी, नळपट्टी. ७. जातीचे प्रमाणपत्र. (SC, ST, OBC)
८. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतिक लंबे,उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार,
नगर अभियंता मिरकले अभिजीत,स्थापत्य अभियंता बाळु भुरे यांनी नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आव्हान केले आहे.
चौकट
विशेष प्राधान्य खालील घटकांना पंतप्रधान घरकुल योजनेसाठी देण्यात येणार आहे.यामध्ये विधाव महिला,दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक,एसी.एसटी,अल्पसंख्याक,फेरीवाले,बांधकाम कामगार,मजुर,पीएम विश्वकर्मा लाभार्थी,अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
चौकट
चाकुर नगरपंचायतीला 2019 ला डीपीआर [स्विस्तार प्रकल्प अहवाल] मध्ये पंतप्रधान आवास योजने साठी 104 आवासा मंजूरी मिळाली होती.त्यानंतर 2021 मध्ये दोन वेळा डीपीआर मंजूर झाले.यामध्ये साधारणतः 267 घरकुल आवासा परवानगी मिळाली होती.आतापर्यंत 371 घरकुल आवास योजनेसाठी मंजूरी मिळविण्यात आली होती.त्यामध्ये जवळपास 45 पंतप्रधान आवास योजनेचे काम पुर्ण झाले आहेत.55 घरकुल सध्या प्रगतीपथ्थावर आहेत.शहरातील नागरिकांना जास्तीतजास्त लाभ द्यावे असे सांगण्यात आले आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0