शिवशाही-बसमध्ये-बलात्कार-नेमकं-काय-घडलं
शिवशाही-बसमध्ये-बलात्कार-नेमकं-काय-घडलं
पुण्यासह सगळ्या राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली आहे. आज पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला? तपास कसा सुरु आहे? या बद्दल माहिती दिली.
पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. आज पोलिसांनी हा गुन्हा नेमका कसा घडला? तपास कसा सुरु आहे? या बद्दल माहिती दिली आहे. “पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं”
“त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. “मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि दुष्कृत्य केलं” अशी माहिती पोलिसांनी दिली.
मित्राला फोन लावला
“त्यानंतर आरोपी आधी बसमधून उतरला. त्यापाठोपाठ दोन मिनिटांनी मुलगी उतरली. ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने तिथून मित्राला फोन लावला. मित्राच्या सल्ल्यावरुन तिने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच आम्ही कारवाई सुरु केली” अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी शिरुर गावचा
“आम्ही सीसीटीव्ही फुटेज काढलं. आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी शिरुर गावचा आहे. त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. कालपासून आठ टीम काम करत आहेत” असं पोलिसांनी सांगितलं.
…तर तिला काही मदत मिळू शकली असती
बसमध्ये बलात्कार होतो, आजूबाजूला कोणाला कळत नाही. बस लॉक केली नाही ही चूक चालकाची की वाहकाची? सिस्टिममध्ये त्रुटी आहेत असं वाटतं नाही का? या प्रश्नावर “पोलिसांच पेट्रोलिंग सुरु असतं. पण प्रत्येक बस पोलीस चेक करु शकत नाहीत. ही बस आतमध्ये होती. घटनेनंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेली. तिथे आरडाओरडा केला असता, तर तिला काही मदत मिळू शकली असती” असं पोलीस म्हणाले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0