राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा आहे
राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा आहे
शेतकऱ्यांची माती व्यवस्था करते
आजच्या समाज व्यवस्थेतील भरडला जाणारा व बेदखल असा शेतकरी आहे.शेती भरघोस उत्पादन होते,पण त्या शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही.भारत शेतीप्रधान देश आहे.शेतीमालावर देशाचे सांस्कृतिक वैभव उभारले आहे,शेती उद्योग, व्यवसायाला चालना देते.राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा आहे. पण या देशाची व्यवस्था कधीच शेतकऱ्यांच्या हिताची नाही.म्हणून शेती शेतकऱ्यांची माती करीत नसून ही व्यवस्था शेतकऱ्यांची माती करते असे शेती मातीच करणार का? परिसंवादात बोलताना शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील डॉ.जयद्रथ जाधव यांनी केले.
माय मराठी चॅनेल, अरूणा प्रकाशन व निसर्ग मंडळ तादलापूर यांच्या संयुक्तपणे गावगाडा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन तादलापूर येथे काल संपन्न झाले.या संमेलनाच्या दुसऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्री गोविंदराव भोपणीकर होते.तर डॉ.ज्ञानदेव राऊत, माधवराव मल्लिशे व डॉ.सचिन खडके सहभागी होते.
यावेळी डॉ. जयद्रथ जाधव यांनी सांगितले की, 'शेती बीज नेता थोडे मोटे आणिताती गाडे' असे संत नामदेवांनी म्हटले होते.शेती भरघोस उत्पादन देते.शेती उत्पादनांवर सरकार लोक कल्याणकारी योजना राबविते. परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला रास्त भाव देत नाही.चार वर्षांपासून सोयाबीनचे बाजारभाव चार हजारांच्या पुढे जात नाहीत.पण शेतीलागवडी खर्च चार पट वाढला आहे.याचा विचार सरकार करणार आहे की नाही? ही व्यवस्था उलट शेतकऱ्यांना पुस्तकी मार्गदर्शन करते. परंतु शेती निसर्गावर अवलंबून असल्याने ती पुस्तकी मार्गदर्शनाने करता येत नाही.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धरण, रस्ते,औद्योगीकरण, शहरीकरण उभारणीत शेतकऱ्यांनी आपल्या नाममात्र मावेजा घेऊन जमिनी दिल्या. पण त्या बदल्यात शेतकऱ्यांना सरकारने काय दिले ?असा सवाल आहे.
डॉ.ज्ञानदेव राऊत म्हणाले की,१९८६ ची साहेबराव करपेची पहिली आत्महत्या शासनाच्या बेदखल वृत्तीतून झाली. शेतकऱ्यांना शेती मधून त्याच्या जगण्या इतकेही पैसे मिळत नाहीत.प्राथमिक गरजाही भागत नाहीत. म्हणून आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे. म्हणजे ही व्यवस्था शेतकऱ्यांचे खून कशी पाडते आहे याचे दाखले कविता, कादंबरीतून दिले.शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माधवराव मल्लिशे म्हणाले की, आज नागरी समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. तुम्ही पिकवत राहा पण भाव मागू नका अशी आजची स्थिती आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करतो आहे. सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे. डॉ.सचिन खडके यांनी महात्मा फुले यांच्या संकल्पनेतील ग्रामविकास व राजकारण आज नाही.देशाला जगवणारा शेतकरी आज आत्महत्या करतो आहे पण याचे भान व्यवस्थेला नाही.कृषिप्रधान अर्थव्यवस्था निर्माण करण्यात देश अपयशी ठरला आहे.
अध्यक्षीय समारोपात श्री गोविंदराव भोपणीकर यांनी वक्त्यांचा आढावा घेऊन आपली भूमिका मांडली.शेतकरी अहोरात्र कष्ट करून शेती पिकवतो.शेतीत भरघोस उत्पादन होते.शेती आम्हाला भरभरून देते पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव शासन देत नाही,म्हणून शेतकऱ्यांची माती शेती करीत नाही तर शासन करते अशी खंत गोविंदराव भोपणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.
या परिसंवादाला गावगाडा संमेलनाचे अध्यक्ष मॅक्सवेल लोपीस, उद्घाटक डॉ. साहेबराव खंदारे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर, डॉ.मुकुंद राजपंखे,विद्या परिषदेचे सदस्य डॉ. नारायण कांबळे, अनंत कदम, धनंजय गुडसूरकर, राजेसाहेब कदम, अनिल चवळे, शिवशंकर पाटील, राजकुमार बिराजदार उपस्थित होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ कांत जाधव यांनी केले तर आभार डॉ.दीपक चिद्दरवार यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0