डीबीटी-आयसीएमआर-आयसीएआर-स्पर्धा-परीक्षा-महत्त्वपूर्ण-डॉ-राहुल-मोरे
डीबीटी-आयसीएमआर-आयसीएआर-स्पर्धा-परीक्षा-महत्त्वपूर्ण-डॉ-राहुल-मोरे
लातूर : वैज्ञानिकांची जयंती साजरी करत असताना,त्याद्वारे भेटलेली माहिती ही फक्त ऐकून न घेता ती माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी.कारण त्याद्वारे वैज्ञानिकाच्या कार्याचे सखोल ज्ञान भेटते.अशा ज्ञानाचा वापर नेट,सेट अशा कॉम्पिटिटिव्ह स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते,असे प्रतिपादन डॉ.राहुल मोरे यांनी केले.तसेच, डीबीटी,आयसीएमआर, आयसीएआर इत्यादी स्पर्धा परीक्षा बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जैवतंत्रज्ञान मंचाच्या माध्यमातून दि. २८ जानेवारी २०२५ रोजी रॉबर्ट विल्यम हॉली यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.राहुल मोरे आणि डॉ.महेश करळे यांनी वैज्ञानिकाच्या प्रतिमेस वंदन करून केली.जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा.सुभद्रा परगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
यावेळी बी.एस्सी.जैवतंत्रज्ञान प्रथम वर्गातील विद्यार्थी शेंडगे शिवराज याने वैज्ञानिकाची माहिती प्रकाशझोतात आणली.रॉबर्ट विल्यम हॉली यांचा जन्म २८ जानेवारी १९२२ रोजी झाला.ते अमेरिकन बायोकेमिस्ट होते.१९६८ मध्ये (हर गोविंद खुराना आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्यासमवेत) शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांनी ॲलनाइन ट्रान्सफर आरएनए, डीएनए आणि प्रथिने संश्लेषण यांच्या संरचनेचे वर्णन केल्याबद्दल सामायिक केले.११ फेब्रुवारी १९९३ रोजी त्यांचे निधन झाले.
याप्रसंगी जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा.श्वेता मदने,डॉ.फिरदौस बिरादार व शिक्षकेत्तर कर्मचारी विशाल टार्फे,लक्ष्मण शिंदे,अशोक मदने,अश्विनी ढवारे तसेच जैवतंत्रज्ञान विभागातील पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0