रेणापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस
रेणापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस
आ. कराड यांच्या प्रयत्नातून मुर्गाप्पा खुमसे यांचे नाव
लातूर दि.१६ - मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील लढवये स्वातंत्र्य सेनानी रेणापूरचे भूमिपुत्र मुर्गाप्पा खुमसे यांचे सत्याग्रह, त्याग, कष्ट आणि कार्य अनेकांना प्रेरणादायी असून भावी पिढीला स्फूर्ती मिळावी यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे स्व. खुमसे यांचे नाव रेणापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस देण्याचा निर्णय राज्यातील महायुती शासनाने नुकताच घेतला आहे.
युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षण संस्थांच्या नावात ८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार नेमण्यात आलेल्या एकसदस्यीय समिती त्या जिल्हयाचे पालकमंत्री यांच्याशी विचारविनिमय करुन नावात बदल करणेबाबत निर्णय घेण्यात घेण्यात आला. त्या अनुषंगाने १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याबाबत बाब शासनाच्या विचाराधीन होती.
भाजपाचे नेते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आ. रमेशआप्पा कराड यांनी शेतकरी, शेतमजूर, दिन दुबळे आणि मागास घटकासाठी सातत्याने लढा उभारणारे, निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवणारे, मराठवाडा मुक्ती संग्राम लढायातील लढवये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. मुर्गाप्पा खुमसे यांचे कार्य, सत्याग्रह प्रेरणादायी असल्याने भावी पिढीला स्फूर्ती मिळावी यासाठी रेणापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस रेणापूर येथील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय मुर्गाप्पा खुमसे यांचे नाव देण्यात यावे याकरिता संबंधितांकडे पाठपुरावा केला. आ. कराड यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार रेणापूर सह राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नांव बदलण्यास महायुती शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत १५ जानेवारी २०२५ रोजी च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.
रेणापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मुर्गप्पा खुमसे यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे रेणापूर येथील स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष सोमनाथ रोडे, सचिव के. ई. हरिदास, प्रा. भारत संपत्ते यांच्यासह भाजपाचे नवनाथ भोसले, अनिल भिसे, महेंद्र गोडभरले, दशरथ सरवदे, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, अनंत चव्हाण, सतीश आंबेकर, वसंत करमोडे, बाबासाहेब घुले, चंद्रकांत कातळे, शरद दरेकर, अच्युत कातळे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोठेगावकर, दत्ता सरवदे, सुधीर तोडकरी, उत्तम चव्हाण, महेश गाडे, मनोज कराड, अमर चव्हाण, संतोष राठोड, जयप्रकाश हलकुडे, श्रीकृष्ण जाधव, सुकेश भंडारे, माऊली भिसे, शेख अजीम, राजकुमार आलापुरे, सिद्धेश्वर मामडगे, नामदेव बोबडे, राजू रायवाडे, श्रीकृष्ण पवार, लक्ष्मण यादव, नरसिंग येलगटे, रमाकांत फुलारी, निवृत्ती चिद्रे, गणेश माळेगावकर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकाच्या परिवारातील सदस्य आणि भाजपाच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आभार व्यक्त केले आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0