महात्मा बसवेश्वरमध्ये महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे आयोजन
महात्मा बसवेश्वरमध्ये महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे आयोजन
महात्मा बसवेश्वरमध्ये महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे आयोजन
प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भीमाशंकर बिराजदार आणि सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांचे प्रमुख मार्गदर्शन
लातूर दि. ०१ जानेवारी
महात्मा बसवेश्वरांच्या आचार-विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याच्या एका व्यापक विचारातून आणि शिक्षणामुळेच समाजाची सर्वांगीण प्रगती होते या सकारात्मक दृष्टिकोनातून धर्मवीर श्री. देशीकेंद्र महाराज यांनी जून १९७० मध्ये श्री.महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाची स्थापना केली.
श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात गेली ४५वर्ष अविरतपणे सुरू असणारी प्रतिष्ठित “महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला” यावर्षी दि. ०२, ०३, ०४ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये महाविद्यालयातील ग्रंथालयातील विद्यार्थी अभ्यासिकेत दररोज सायं. ५:०० वा. आय. क्यू. एसी. आणि महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. ०२ जानेवारी २०२५ रोजी श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांची उपस्थिती असणार आहे. तर संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसेचिंचोलीकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे. “अस्वस्थ वर्तमानाच्या हाका” या विषयावर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के हे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शुक्रवार दि. ०३ जानेवारी २०२५ रोजी सोलापूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भीमाशंकर बिराजदार हे “महात्मा बसवेश्वर विद्रोही कवी, समाज सुधारक” या विषयावर गुंफणार असून अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांची उपस्थिती राहणार आहे.
शनिवार दि. ०४जानेवारी २०२५ रोजी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प आणि समारोप श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक राजेश्वर बुके यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न होणार असून प्रमुख वक्त्या म्हणून बीड येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले ह्या भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त “भारतीय संविधान आणि आपण” या विषयावर गुंफणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सहसचिव सुनील मिटकरी, संचालक गुरुलिंग धाराशिवे आणि बसवराज येरटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या व्याख्यानमालेचा लाभ शहरातील मान्यवर, नागरिक, अभ्यासक, समीक्षक, प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, पालक, विद्यार्थी आणि बसवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, मुख्य समन्वयक डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. वनिता पाटील, आयक्युएसी समन्वयक डॉ. आनंद शेवाळे, संयोजक डॉ. रत्नाकर बेडगे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे आणि व्याख्यानमाला संयोजन समितीचे सहसंयोजक डॉ. सिद्राम डोंगरगे, सहसंयोजक डॉ. मनोहर चपळे, प्रा. एस. एस. पानगावे, प्रा. व्हि. जी. दुडिले, डॉ. टि. घनश्याम, प्रा. के. आर. कुडके, प्रा. के. डी. गिराम, डॉ. ए. एस. रोडे, प्रा. जे. जे. पाटील, प्रा. ए. आर. घवले, महादेव कोरे, जलील सय्यद, श्रीकृष्ण बडगिरे आणि शुभम बिरादार आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0