८,३८,२७,५०८/-आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
८,३८,२७,५०८/-आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
लातूर,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील रा.प.लातूर विभागातील लातूर बस स्थानक क्रमांक दोन आंबेजोगाई रोड येथील आवारात विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या बसेस करिता विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी रू.८,३८,२७,५०८/-आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मुंबई येथे भेट घेत लातूरच्या राज्य परिवहन विभागातील विविध समस्यांवर चर्चा केली होती त्यापैकी प्रामुख्याने बसेसची मागणी व चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ची मान्यता या दोन विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली होती त्यामध्ये लातूर साठी दहा बसेस प्राथमिक स्वरूपात मंत्री महोदयांनी मंजूर केल्या त्याचप्रमाणे नागरिकांना अद्ययावत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासोबतच इलेक्ट्रिक बसेस ची मागणी व त्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागातील बस स्टँड क्र.२ येथील आवारात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ची उभारणी करण्याबाबतचा प्रलंबीत प्रस्तावा बाबत मा.मंत्री महोदयांशी चर्चा करताना ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.आपण विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या ई-बसेस साठी विद्युत चार्जिंग स्टेशन च्या उभारणी साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा.मंत्री महोदयांकडे मांडली होती.
याच मागणीप्रमाणे नुकतेच राज्य सरकारने या ठिकाणी आठ कोटी 38 लाख 27 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली आहे यामुळे लातूर येथे चार्जिंग स्टेशन उभारणीच्या मार्ग मोकळा झाला असून आगामी दोन महिन्यांमध्ये कामास सुरुवात होणार आहे.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी प्रवाशांना वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास मिळावा त्याचबरोबर प्रदूषणाला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे एसटीच्या लातूर विभागालाही 109 इलेक्ट्रिकल बस मंजूर झाल्या आहेत या अनुषंगाने आवश्यक चार्जिंग स्टेशन संदर्भात मंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत तसेच मंत्री महोदयांनी ही मागणी लक्षात घेत या विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणी साठी ८.३८,२७,५०८/- (आठ कोटी अडतीस लाख सत्तावीस हजार पाचशे आठ रू.) एवढा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे उर्वरीत बसेस या इलेक्ट्रिक प्रणालीच्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
त्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री मा.श्री प्रतापजी सरनाईक यांचे तसेच या. मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रभाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. ना.श्री अजितजी पवार, लातूरचे पालकमंत्री मा.ना श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले व महायुती सरकारचे आभार मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0