तुत्तीच्या-काडी-पासून-माडी-बांधायची-असेल-तर-रेशीम-शेती/उद्योग करा
तुत्तीच्या-काडी-पासून-माडी-बांधायची-असेल-तर-रेशीम-शेती/उद्योग करा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर आयोजित कृषी प्रदर्शनमध्ये आजच्या दिवशी रेशीम शेती या विषयावर श्री.वराट साहेब जिल्हा रेशीम अधिकारी,लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते तर यावेळी रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सिद्धेश्वर कागले,शत्रुघन फड,सुनील वडसकर या शेतकऱ्यांना मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री वराड साहेबांनी रेशीम शेती विषयी सांगताना उष्णकटिबंधीय प्रदेशात रेशीम उद्योग/शेती चांगल्या प्रकारे करता येतो आणि यासाठी लातूर जिल्हा योग्य आहे व कमी भांडवलावर सुरू होणारा हा उद्योग/शेती आहे,विशेष म्हणजे 3 महिन्याच्या आत बाग तयार होते.यासाठी वापसा कंडिशनची जमीन निवड करावी लागते आणि जास्तीत जास्त 8 महिने पाणी असले तर चालते आणि कमी पाण्यात येणारे हे पीक आहे,याला रासायनिक फवारणीची गरज नाही एकदा लावले की हे पीक पंधरा वर्षे टिकते.
पुढे श्री.वराट यांनी सांगितले की,1960 साली या उद्योगाची सुरुवात झाली सध्या देशात कर्नाटक राज्य अव्वल स्थानी आहे.तर महाराष्ट्र राज्यात बीड अव्वल स्थानी आहे.रेशीम शेतीत एका वर्षात 4 बॅच मधून कमीतकमी 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
लातूर व बीडच्या कोषाला मार्केटमध्ये जास्त भाव आहे.रेशीम शेतीसाठी नरेगा मधून 3 वर्षात 4 लाख 18हजार 815 रुपये अनुदान मिळते. तसेच यासाठी सिल्क समग्र योजनेतून पॅकेज स्वरूपात अनुदान मिळते.
रेशीम शेतीमध्ये 20% खर्च 80% उत्पन्न मिळते तर रेशीम शेतीसाठी 3 लाख 60 हजार बिगर व्याजी कर्ज मध्यवर्ती बँकाकडून मिळते असे श्री.वराट साहेबांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे,मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे,मनसे रोजगार व स्वयंरोजगार राज्यचिटणीस सचिन सिरसाट,शहराध्यक्ष मनोज अभंगे,जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रणवीर उमाटे,रेणापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे,मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम,कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0