खरोळा सोसायटीचे चेअरमन सुधाकर काळे यांचे आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिनंदन
खरोळा सोसायटीचे चेअरमन सुधाकर काळे यांचे आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिनंदन
लातूर दि. ०३- रेणापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खरोळा सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच सुधाकर काळे यांची निवड झाली असून या निवडीबद्दल भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.
पंधरा कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या आणि शेतकऱ्याच्या हितासाठी कार्यरत असलेल्या रेणापूर तालुक्यातील खरोळा सेवा सहकारी संस्थाची निवडणूक होऊन चेअरमन पदासाठी अडीच वर्षाचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणे संस्थेचे चेअरमन मोहनराव राऊतराव यांनी राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी सुधाकर काळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात नवनिर्वाचित चेअरमन सुधाकर काळे यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रभाकर कुलकर्णी, निवृत्ती आदुडे, माजी चेअरमन मोहनराव राऊतराव, मुकुंद कलूरे यांचा सत्कार आ. कराड यांच्यावतीने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गोडभरले यांनी सत्कार केला.
प्रारंभी आ. रमेशआप्पा कराड यांचा ओमप्रकाश गोडभरले आणि सुधाकर काळे यांनी सत्कार केला. यावेळी माजी सरपंच बालाजी मानमोडे, माजी सरपंच चंद्रकांत अदुडे, किशोर कुलकर्णी, बाळकिशन आदुडे, रमाकांत फुलारी, जेष्ठ कार्यकर्ते अनिल येलगटे, मुस्तफा तासेवाले, संजय पिंपळे, बंडु पांचाळ, नंदकुमार वलमपल्ले, मधुकर राऊतराव, अँड पांडुरंग आदुडे, शिधु पिंपळे, नागनाथ आडतराव, रामवाडीचे माजी सरपंच नरबा तोकटे, रामभाऊ कागले, शालीक गोडभरले, पांडुरंग भोपी, बाळकिशन काळे, बालाजी राऊतराव, बालाजी सुरवसे, संतोष कुलकर्णी, राजेंद्र भोपी, विश्वनाथ चित्ते, बालासाहेब राऊतराव, राम कागले, मच्छिंद्र ऊगले, ऊतम गोडभरले, नंदकुमार आचार्य, बाळासाहेब गौड. सुनील गौड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0