श्रीलंका धम्मसहलीहून परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा भव्य सत्कार होणार
श्रीलंका धम्मसहलीहून परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा भव्य सत्कार होणार
नांदेड - मार्गशीर्ष पौर्णिमा ही पौर्णिमा डिसेंबर महिन्यात येते. मार्गशीर्ष पौर्णिमेला बौद्ध धम्माशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे परिव्राजक सिद्धार्थ गौतम व राजा बिंबिसार यांची भेट झाली. दुसरी घटना देवदत्ताने बुद्धाला मारण्यास सोडलेल्या नालागिरी हत्तीवर बुद्धाचा विजय झाला. या पौर्णिमेच्या दिवशी सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने श्रीलंकन भिक्खूणी संघाची स्थापना केली. याच पौर्णिमेच्या दिवशी बोधगया येथील बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेतील अनुराधापूर येथे भिक्खूणी संघमित्रा हिच्या हस्ते लावली गेली. आजही अनुराधापूर येथे त्या फांदीपासून निर्माण झालेला वृक्ष उभा आहे. हा बोधिवृक्ष सिद्धार्थ गौतम बुद्धाने दुःख मुक्तीसाठी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचे पालन करण्यासाठी सर्व लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहे.
यामुळे या पौर्णिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आज १९ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त 'पौर्णिमोत्सव' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील श्रद्धा काॅलनीतील बौद्ध उपासिकांकडून भव्य भोजनदान होणार असून श्रीलंका धम्मसहलीत सहभागी झालेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा भव्य सत्कार होणार आहे. तसेच या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात महिन्याच्या दर पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ३६५ दिवस चालणाऱ्या व २४ तास श्रामणेर दीक्षेकरिता सुरू राहणाऱ्या या केंद्रात जिल्हा, जिल्हा परिसर आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतून उपासक दीक्षा घेण्यासाठी येत असतात. तसेच जगातील बौद्ध राष्ट्रांचे धम्म पर्यटन हा उपक्रमही केंद्रातर्फे राबविण्यात येतो. आज १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात श्रीलंका धम्माभ्यास सहलीहून परतलेल्या बाबुराव वाघमारे, सुनंदा वाघमारे, कविता हिंगोले, जिजाबाई केळकर, किशन कांबळे, विमलबाई कांबळे, रत्नप्रभा जाधव, श्रीराम जाधव, सतीश हटकर, कविता हटकर, शांता सोनसळे, सुधाकर सोनसळे, शोभा हटकर, अशोक हटकर, उत्तम शिवभगत, चंद्रकला शिवभगत, मारोतराव उबारे, वंदना उबारे, चंद्रप्रकाश हनमंतकर, पुंडलिक कसबे, सरोजा कसबे, द्रौपदी कांबळे, रेखा सावते, रोहिदास सोनवणे, सुरेखा सोनवणे, लक्ष्मण डुमणे, रंजना डुमणे, राजू वाघमारे, जीवक वाघमारे, छाया सुर्यवंशी, अशोक कांबळे, कल्पना कांबळे, श्रुती जवळगेकर यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळपासूनच सुरू होणाऱ्या कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, गाथापठण, भोजनदान, आर्थिक दान, औषधी तथा विविध वस्तूंचे दान, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांच्या गायनाचे कार्यक्रम होणार आहेत. याच परिसरात श्रामणेर धम्मसंकल्प दीक्षाभूमीचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी आर्थिक दान होणार आहे. या निमित्ताने कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0