क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिव जन्मोत्सव साजरा
क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिव जन्मोत्सव साजरा
अहमदपूर
दि.१९ फेब्रुवारी रोजी तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल & ज्युनियर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी शाळेच्या सीईओ रितू मद्देवाड माले, प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, राहुल अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंती निमित्ताने शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भाषणे, कविता, घोषणा व समूह नृत्याचे सादरीकरण झाले. प्राचार्या जेबाबेरला नादार यांनी शिवरायांप्रमाणे आत्मनिर्भर, स्वावलंबी, देशाचे जबाबदार नागरिक बना असा सल्ला आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला. शिक्षक राहुल अडसूळ आपल्या भाषणात म्हणाले छत्रपतींचा लढा हा अन्यायाविरुध्द होता, नाही की मुसलमानांविरुद्ध किंवा एका जातीविरूद्ध. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणे, योग्य न्याय देणे हेच शिवरायांचे विचार आपण आपल्या अंगी विदयार्थीदशेत बाळगणे गरजेचे आहे, हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. सीईओ रितू मद्देवाड यांनी शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूल परिस्थिती निर्माण केली. ही विचारसरणी तूम्ही विद्यार्थांनी डोळ्यासमोर ठेऊन उद्याचे जबाबदार, प्रामाणिक नागरिक बना अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीचे विद्यार्थी श्रीनिवास धुळगुंडे व सुरज चावरे यांनी केले. आभार शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, सर्व शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , अंजली मद्देवाड, सूर्यकांत गोरे, योगिता ढवळे, धनंजय राचमाळे आदींनी तसेच वसतिगृहातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0