एस.एम.आर. स्विमिंग पूल अँड हेल्थ क्लबच्या माध्यमातून
एस.एम.आर. स्विमिंग पूल अँड हेल्थ क्लबच्या माध्यमातून
उत्कृष्ट समाजकार्याचा वारसा : सोमय मुंडे
लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित एस.एम.आर. स्विमिंग पूल अँड हेल्थ क्लबच्या माध्यमातून लातुरात उत्कृष्ट समाजकार्याचा वारसा जोमाने पुढे चालविला जातोय, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले.
एस.एम.आर. स्विमिंग पूल अँड हेल्थ क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी या नात्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीरमण लाहोटी हे होते. यावेळी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेशकुमार लाहोटी, पुणे येथील माइंड मॅजिक शोचे अमित कलंत्री, संस्था अध्यक्ष राजकुमार मालपाणी, हुकूमचंद कलंत्री, कमलकिशोर अग्रवाल, लक्ष्मीकांत कर्वा, डॉ हरिप्रसाद सोमाणी, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आपल्या मनोगतात सोमय मुंडे यांनी शिक्षणाची पंढरी म्हणून राज्यभरात नावलौकिकास पात्र ठरलेल्या लातूरमधील एसएमआर स्विमिंग पूल अँड हेल्थ क्लब या संस्थेने मागच्या २५ वर्षात दूरदृष्टी ठेवून कार्य केले आहे. लातूर शहरातील एक दर्जेदार आणि उत्कृष्ट स्विमिंग पूल म्हणून विश्वासाने याकडे पहिले जाते. कोणतीही संस्था अथवा उपक्रम चालविताना दृष्टिकोन खूपच महत्वाचा असतो. दृष्टीकोनावरच विश्वास ठेवून समाजातील विविध घटकातील लोक संबंधित संस्थेची जोडली जात असतात. लोकांच्या सहभागाशिवाय संस्था यशस्वी होऊ शकत नसते. या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन खेळाडू घडविण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्यामुळे भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून तयार झालेले बॅडमिंटन खेळाडू राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकल्याशिवाय राहणार नाहीत,असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या रौप्यमहोत्सवास आपल्याला निमंत्रित केले गेले, तसेच संस्थेच्या सुवर्ण महोत्सवासही आवर्जून निमंत्रित करा, मी जेथे कार्यरत असेन तेथून नक्की आपल्या कार्यक्रमास येईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संस्था अध्यक्ष राजकुमार मालपाणी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या या यशात समाजातील सर्वच घटकांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव अॅड. आशिष बाजपाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी स्विमिंग पूल व हेल्थ क्लबच्या २५ वर्षातील प्रगतीचा लेखाजोखा संक्षिप्त स्वरूपात उपस्थितांपुढे मांडला . संस्थेच्या उभारणी दरम्यान सहकार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या नावांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. आपल्या संस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठीही भरीव कार्य केले जात असल्याचे नमूद करून त्यांनी राज्यात क्रीडा विद्यालयाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून त्यासंदर्भात आपण राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीही केली होती असे सांगितले. पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासोबत त्यांच्या शरीर स्वास्थाकडेही आवर्जून लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुण्याच्या अमित कलंत्री यांनी माईंड मॅजिक शोचे सादरीकरण करून उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. यावेळी संस्थेच्या प्रगतीत भरीव योगदान दिलेल्या अजितलाल आळंदकर, जुगलकिशोर गिल्डा, सत्यनारायणजी कर्वा यांच्यावतीने श्रीकांत कर्वा , करुणाकरण शेट्टी, विजयकुमार सहदेव, स्व. शाम भार्गव यांच्या स्मृत्यर्थ चैतन्य भार्गव, स्व. रामकिशन भंडारी यांच्या स्मृत्यर्थ हरिकिशन भंडारी, स्व. मुरलीधरजी इनानी स्मृत्यर्थ दिनेश इनानी यांचा पोलीस अधीक्षक मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात करण्यात आला. तसेच संस्थेच्या यशात योगदान देणाऱ्या सर्वश्री मिलिंद शेटे, भाऊसाहेब भालेराव, संतोष दुधाळे , बाबा पालखे, सतीश जोशी, विशाल कांबळे, अमित शहा आदी कर्मचाऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आशिष सोमाणी यांनी केले. कार्यक्रमास समाजाच्या विविध स्तरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0