विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करावे : सहाय्यक आयुक्त श्री. बी. एस. मरे
विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करावे : सहाय्यक आयुक्त श्री. बी. एस. मरे
लातूर : येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ‘युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटर्सी’ विशेष वार्षिक शिबिरात मौजे जमालपुर येथे दिनांक 12 फेब्रुवारी, 2025 रोजी समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्या परिषद सदस्य डॉ. नारायण कांबळे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही समाजाला संस्कारक्षम पिढी घडविण्याचे विद्यापीठ आहे. या योजनेअंतर्गत विशेष शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रम संस्काराचे धडे दिले जातात.योग प्राणायाम, श्रमदान, आरोग्य विषयक माहिती, पर्यावरण संवर्धन विषयक जणींवा, बौद्धिक संस्कार, सर्वेक्षण, यासारख्या उपक्रमातून समाजातील विविध समस्या जाणून घेण्याची संधी मिळते. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक असते. या संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाशी जोडला जातो. समाजाशी जोडला की रा.से.यो.चे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही बिन भिंतीची शाळाच नव्हे तर संस्कारक्षम पिढी घडविणारे विद्यापीठ आहे, असे मत यावेळी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना लातूर जिल्हा रोजगार व उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. बी. एस. मरे म्हणाले की दिवसेंदिवस समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यातही सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण अधिक वाढत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात प्रत्येकालाच शासनास नोकरी देणे अशक्य आहे, म्हणून युवकांनी पदवीचे शिक्षण घेत असताना व्यावसायिक कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे म्हणाले क, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घेऊन या सात दिवसाच्या शिबिरातच घडलेल्या संस्काराची शिदोरी तुम्हाला जीवनभर पुरेल अशा पद्धतीने समाज व देशहितासाठी त्याचा योग्य वापर करावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. बालाजी घार, डॉ. केशव आलगुले,डॉ. रामेश्वर स्वामी, श्री. विवेक देशमुख, सरपंच श्री. खंडू सोनटक्के,डॉ. कांत जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती, प्रास्ताविक जिल्हा समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव आलगुले, सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा कांबळे, व आभार डॉ. अविनाश पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री.जाधव रामदास, संदीप आडे, शितल पवार, अविनाश सूर्यवंशी, राधिका बैले, रुकसाना सय्यद, स्नेहा शिंदे, शबनम पठाण, श्रावणी स्वामी, निशांत परळकर, संदीप आडे, साहिल शेख, आदिल शेख, हर्षवर्धन बिराजदार, अमित गारोळे, सचिन थोरात, रोहित जगताप, शिवशंकर मूडपे, रतन पालके यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0