जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी
जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी
नांदेड, दि. 27 डिसेंबर :- राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 713 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय सहभागी होणार आहेत. यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सज्ज झाली आहेत.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ निमित्त 1 ते 15 जानेवारी दरम्यान सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथा-कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल वा.सुर्यवंशी यांनी केले आहे.
या उपक्रमात सर्व ग्रंथसंपदेचे एकत्रित वाचन केले जाणार असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्या- त्या गावातील जेष्ठ नागरीक, महिला यांचाही सहभाग असणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्ह्यातील 713 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दररोज वाचन विषयक कार्यक्रम होणार आहेत.
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम १ ते १५ जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. नांदेड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राम मनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालय, महानगरपालिका तसेच शंकरराव चव्हाण, माध्यमिक विद्यालय व महात्मा फुले सेमी इंग्लीश स्कुल व ज्युनियर कॉलेज वासरी ता.मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियान राबविण्यात येणार आहे.
वाचन पंधरवड्या निमित्त सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबविली जाणार असून ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. नांदेड शहरातील नागरिक, शाळेतील पालकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल वामनराव सुर्यवंशी आणि शाळेचे मुख्याध्यापक पूजा एम कदम व प्राचार्य शिवाजी उमाटे व महानगरपालिकेचे सहाय्यक ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0