पुरोगामी महाराष्ट्रात महिला नेतृत्वाचे पर्व आनंददायी : प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
पुरोगामी महाराष्ट्रात महिला नेतृत्वाचे पर्व आनंददायी : प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय (वाणिज्य व विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठस्तरीय युवती नेतृत्व विकास कार्यशाळा २०२४- २५ जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालयात संपन्न होत आहे. युवती शिबिरास विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून १२० मुलींनी सहभाग नोंदविला.या शिबिराचे उद्घाटन दिनांक १० मार्च २०२५ रोजी संपन्न झाले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष संस्थेचे सचिव प्रा. गोविंदरावजी घार, उद्घाटक राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. महादेव गव्हाणे, प्रमुख पाहुणे डॉ. मल्लिकार्जुन करजगी, संचालक राष्ट्रीय सेवा योजना स्वा.रा.ती. म. विद्यापीठ नांदेड, श्री धर्मराज हल्लाळे दै.लोकमत उपसंपादक लातूर, डॉ.कुसुम मोरे सिनेट सदस्य, स्वा.रा.ती. म. विद्यापीठ, नांदेड, प्रा.राहुल वाघमारे विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना लातूर, प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रो. श्रीधर कोल्हे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद तांदळे ,रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी डॉ. महादेव गव्हाणे म्हणाले की, सध्या पुरोगामी महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात महिला नेतृत्व करत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. वैदिक काळापासून महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ज्यात मैत्रयी, गार्गी, आधुनिक काळातील पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी,सुधा मूर्ती यांच्या सारख्या महिलांनी नेतृत्वगुणांच्या माध्यमातून आपले नाव सुवर्णाक्षरांनी अंकित केले आहे. आज भारतीय संस्कृतीचा विचार केला तर पुरोगामी महाराष्ट्रात वाढत्या सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून एकीकडे प्रगती तर दुसरीकडे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोटाची मागणी करणे इतपत महिला नेतृत्व खंबीर होणे ही सुद्धा एका दृष्टीने महिला नेतृत्वाचे एक परवा असून निमूटपणे अन्याय सहन करत आयुष्य घालविणाऱ्या महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती होऊन आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा निर्धार होत आहे हेच खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्रात महिला नेतृत्वाचे पर्व आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे नेतृत्व गुण विकसित करण्याचा आदर्श घेऊन नेतृत्व गुण विकसित करावे व प्रत्येक क्षेत्रातील यशाच्या उंच शिखरावर युवतीने आपले नेतृत्व सिद्ध करावे असे मत प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दैनिक लोकमतचे उपसंचालक श्री. धर्मराज हल्लाळे म्हणाले की, म्हणाले की,अशी युवती नेतृत्व विकास शिबिरे मुलींना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देतात. महाविद्यालयीन युवतीने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यासाठी त्यांनी नेतृत्व आणि व्यक्तिविकास जयक्रांती महाविद्यालयाचे कौतुकही केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक लातूर जिल्ह्याचे समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव अलगुले यांनी मांडले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. गीता वाघमारे, प्रा. प्रज्ञा कांबळे तर आभार प्रदर्शन डॉ.प्रमोद चव्हाण यांनी मांडले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेश्वर खाकरे प्रा. डॉ. हरिश्चंद्र चौधरी, प्रा. डॉ.दिलीप गुंजरगे, डॉ. संगीता घार, डॉ.पवार राजाभाऊ, डॉ. पवार अविनाश, डॉ. धीरज कोतमे,डॉ.सतीश डांगे, डॉ.रामेश्वर स्वामी, श्री.विजय कनगुले,डॉ. शरण निलंगेकर, डॉ. माया सरवदे, डॉ. समीना शेख, डॉ. सुमन शिंदे, प्रा. प्रज्ञा स्वामी, सुवर्णा शिंदे, पल्लवी भिंगे, डॉ.मोबीन शेख, प्रा.शिवराज बाजुळगे, प्रा.प्रकाश भिंगे, श्री.सचिन शिखरे, श्री. रामदास जाधव, श्री.अमित भालके, सय्यद इब्राहिम, श्री.शरद इगवे, ऋतुजा बिराजदार, विद्यार्थी प्रतिनिधी शितल पवार, खुणे सांची, प्रेरणा धनुरे, लक्ष्मी नालापुरे, सोपान बनसोडे, प्रतीक पालके, अविनाश सूर्यवंशी, अनिकेत भालेराव सर्वांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0