उपकरणांची जोड दिल्यास मानवी आजारांवर मात करणे शक्य
उपकरणांची जोड दिल्यास मानवी आजारांवर मात करणे शक्य
डॉ. सुप्रिया नायर यांचे मत; लातूर एमआयटीत प्रथम राष्ट्रीय “इलेक्ट्रोकॉन – 24” परिषद
लातूर, दि. 22 – मानवी जीवनाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे जीवन शैलीत अमुलाग्र बदल झालेले आहेत. जीवन शैलीतील बदलामुळे अनेक आव्हानात्मक व गुंतागुंतीचे आजार उत्पन्न होत आहेत. सध्या स्थितीतील रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेता परिणामकारक फिजिओथेरपी उपचार पध्दती व तज्ज्ञ यंत्रणेस अत्याधुनिक फिजिओथेरपी उपकरणांची जोड दिल्यास सर्व प्रकारच्या मानवी आजारांवर मात करणे शक्य आहे, असे मत परिषदेच्या प्रमुख पाहुण्या तथा पाँडिचेरी येथील मदर तेरेसा फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुप्रिया विनोद नायर यांनी व्यक्त केले.
लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरपी येथे आयोजित “प्रथम राष्ट्रीय इलेक्ट्रोकॉन – 24” परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या तथा मार्गदर्शक म्हणून डॉ. सुप्रिया के. विनोद बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड हे होते. यावेळी परिषदेचे ऑर्गनायझिंग चेअरमन तथा प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. गौरव भटनागर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे निरीक्षक डॉ. विरेंद्र मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मानवी आजारांचे वाढते प्रमाण आणि गुंतागुंतीवर आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील उपचाराबरोबर फिजिओथेरपी उपचार हे अत्यंत महत्वाचे ठरतात. अत्याधुनिक फिजिओथेरपी उपकरणांमुळे उपचारातील अचुकता वाढली असून ही उपकरणे उपचारात, पुनर्वसनात, सुधारणा घडवून आणण्यासाठी व उपचार कालावधी कमी करण्यासाठी मदतीची ठरत असल्याचे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. सुप्रिया नायर म्हणाल्या की, अत्याधुनिक वेदना व्यवस्थापन वैद्यकीय उपकरणे वेदनाशामक औषधांवरील अवलंबित्व् कमी करण्यासाठी मदतीचे ठरत आहेत.
वेदना ग्रस्त अवयवावर अशा उपकरणांच्या माध्यमातून उपचार करुन रुग्ण बरा होण्यास मदत होते. पॅरेलिसिस, मेंदूरोग, ह्रदयरोग, फुफ्फुसाचे रोग, दुखापत, अपघात अशा कारणांमुळे कमकुवत व अशक्त स्नायू असलेल्या रुग्णांमध्ये विशिष्ट उपकरणांव्दारे स्नायूंना उत्तेजित करण्यास मदत होते. वेदनेने ग्रासलेले अनेक रुग्ण समाजात आहेत. मात्र माहिती व जागृती अभावी हे रुग्ण उपचारापासून वंचित आहेत. अशा रुग्णांना फिजिओथेरपी उपचाराच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे डॉ. सुप्रिया नायर यांनी शेवटी सांगीतले.
यावेळी बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात फिजिओथेरपी ही शाखा अतिशय महत्वाची असून या शाखेची गरज दिवसेंदिवस वाढत असून तरुणांना करिअरच्या दृष्टीकोनातून ही शाखा फायद्याची आहे. वैद्यकीय, आयुर्वेद या शाखांबरोबर फिजिओथेरपी शाखेची तीतकीच गरज आहे. लातूरात होत असलेली राज्यातील पहिली इलेक्ट्रोकॉन - 24 राष्ट्रीय फिजिओथेरपी परिषद ही संशोधक, डॉक्टर व विद्यार्थ्यांच्या हिताची ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. गौरव भटनागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिषदेची स्मरणिका उपस्थितांना भेट देण्यात आली.
या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. नेहा सिंग यांनी केले तर आभार डॉ. शितल घुले यांनी मानले. या परिषदेस देशभरातील फिजिओथेरपी विषयाचे 400 प्राध्यापक, संशोधक, डॉक्टर, विद्यार्थी हे प्रत्यक्ष तर अभाशी माध्यमातून 956 जण उपस्थित होते. त्याचबरोबर एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयातील डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ सिंगार वेलन, डॉ. रिषा कांबळे, डॉ. पवन कुमार, डॉ. शितल घुले, डॉ. झिशान मोहम्मद, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. प्रमोद गायसमुद्रे, डॉ. अनिल साठे, डॉ. सलीम शेख, डॉ. स्मिता मुंडे, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0