मराठीमध्ये रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मराठी भाषा विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल !
मराठीमध्ये रोजगाराभिमुख उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मराठी भाषा विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावेल !
लातूर : मराठी मातृभाषा ही मराठी भाषिकांच्या आत्मिक जिव्हाळ्याचा विषय आहे. अशा या मराठी साहित्यातील कथा, कविता, कादंबरी, नाटक या विविधांगी साहित्याचा व मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळणार आहे. मराठी भाषकांनी मराठी शाळांचा आग्रह धरावा, मराठी भाषा विकासासाठी विविध कार्यशाळा व विविधांगी उपक्रम राबवावेत. हेच काम साहित्य भारतीच्या माध्यमातून केले जाते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे, रिद्धपूर येथे मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे ही आनंदाची पर्वणी आहे आणि विद्यापीठाच्या पहिल्याच व्यवस्थापन मंडळात प्रा.डॉ.सुनीता सांगोले यांची राज्यपालाकडून नियुक्ती होणे ही बाब निश्चितच त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे फलित आहे, असे प्रतिपादन साहित्यभारती देवगीरी प्रांतचे संघटनमंत्री शशिकांत घासकडबी यांनी केले.
मराठी भाषेत दर्जेदार साहित्याची निर्मिती व संशोधन व्हावे. मराठी पुस्तकांचे अनुवाद इतर भाषेत करावेत.
लातूर येथील श्री.केशवराज माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत,साहित्य भारती (महाराष्ट्र प्रांत)जिल्हा लातूर यांच्या वतीने दि.११ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता प्रा.डॉ.सुनीता सांगोले यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सत्कारमूर्ती प्रा.डॉ.सुनीता सांगोले असे म्हणाल्या की, मराठी भाषेला शासनाने दिलेला अभिजात भाषेचा दर्जा आणि अमरावती जिल्ह्यात रिद्धपूर येथे मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे ही मातृभाषा मराठी भाषिकांसाठी अत्यंत जमेची बाजू आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या विद्यापीठाचे अभ्यासक्रम असतील. विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित करणारे हे अभ्यासक्रम रोजगाराच्या तसेच संशोधनास वाव देणारे आहेत. रिद्धपूर विद्यापीठात भाषा अभियांत्रिकी प्रशाला, कला व साहित्य प्रशाला, महाराष्ट्र विद्या व सांस्कृतिक प्रशाला आणि आंतरविद्याशाखीय प्रशाला अशा चार प्रशाला चालवल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर संशोधनाला भरपूर वाव दिला जाणार आहे. साहित्य, संस्कृती, कला, बोलीभाषा, प्रमाणभाषा आणि मराठी भाषेबद्दल मराठी माणसांत सजगता निर्माण करण्यासाठी हे मराठी भाषा विद्यापीठ अग्रेसर राहील, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील नवनिर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण सरदेशमुख होते. समारोप करताना प्रवीण सरदेशमुख असे म्हणाले की, मा.पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. महाराष्ट्र शासनाने अमरावती रिद्धपूर येथे मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले आणि या विद्यापीठाच्या पहिल्याच व्यवस्थापन मंडळामध्ये दयानंद महाविद्यालय, लातूरच्या डॉ.सुनीता सांगोले यांची मा.राज्यपालांनी नियुक्ती केली. प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांची मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथमच झालेल्या व्यवस्थापन मंडळवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती होणे ही बाब लातूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. असे मत व्यक्त केले. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरला व्हावे यामागील औचित्य सांगताना त्यांनी महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेला साहित्याला मोलाचे योगदान दिले यावर प्रकाश टाकला.
मराठी साहित्याचे दालन अत्यंत समृद्ध आहे.त्यात महानुभव व वारकरी संप्रदायाचे फार मोलाचे योगदान आहे.अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभव पंथाचीच नव्हे तर मराठी वाड्मयाची काशी आहे.रिद्धपूरमध्ये ' लीळाचरित्र ' हा मराठीतला पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ लिहिला गेला,इतरही ग्रंथ लिहिले गेले.अशा या पावन भूमीत विद्यापीठ स्थापन करणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. तसेच संत साहित्य हे नोबेल प्राईज मिळेल यापेक्षाही उत्कृष्ट आहे. श्रवणबेळगोळच्या शिलालेखापासूनची मराठी भाषा ही आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे.मराठीत बालकवी, बा.भ.बोरकर, केशवसुत, कुसुमाग्रज अशा दिग्गज साहित्यिकांनी साहित्य निर्मिती केली. पण चारच ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यिकांना मिळाले ही खंत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त मत केले.
प्रास्ताविक मांडताना डॉ.नयन राजमाने यांनी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्यभारतीचा इतिहास सांगितला आणि साहित्य संस्कृती जतन संवर्धन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा.डॉ.शैलजा हासबे यांनी केले तर आभार प्रसिद्ध कवयित्री शैलजा कारंडे यांनी मानले. मराठी भाषा गौरव गीत कांचन तोडकर व पसायदान अथर्व टिंबे यांनी म्हटले.यावेळी भारतमाता व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.याप्रसंगी बबन गायकवाड,डॉ.बालाजी भंडारे,डॉ.व्ही.एस.ढोले,
डॉ.राजेश तगडपल्लेवार,डॉ.रामशेट्टी शेटकार,डॉ.मनोहर चपळे यांच्यासह इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मराठी साहित्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0