मोहम्मद रफी यांना भारतरत्न मिळावा ही जनसामान्यांची भावना..
मोहम्मद रफी यांना भारतरत्न मिळावा ही जनसामान्यांची भावना..
अहमदपुर दि.24 विसाव्या शतकातील महान गायक स्वरसम्राट पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांच्या शंभराव्या जयंती निमित्त नामफलकाला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.
येथील साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी मतदार संघाचे माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,माजी नगरसेवक शेषेराव ससाणे,इमरोजभाई पटवेगर,रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर, सामाजिक नेते अण्णाराव सूर्यवंशी,दयानंदराव वाघमारे,शेखूभाई शेख,सय्यद याखूबभाई,जकीभाई पिंजारी, गणीभाई पत्रे,शेख चांद सौदागर, शिलाताई शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे अध्यक्ष युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून गेल्या बावीस वर्षापासून सूरू असलेल्या सांस्कृतिक चळवळीतील आढावा साजरा करण्यात आला.
तर माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी आपला अध्यक्षीय समारोप करताना मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजातून राष्ट्रभक्ती,प्रेम,सद्भावना,राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत करण्याचा प्रयत्न केला आहे.अशा अष्टपैलू गायकास मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी जनभावना असून यासाठी आपण पून्हा एकदा सामूहिक पाठपुरावा करून या असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी सूत्रसंचलन पत्रकार मेघराज गायकवाड यांनी केले तर आभार सय्यद याखूबभाई यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन बानाटे,आकाश पवार, डाॅ.बालाजी थिट्टे, माधव तिगोटे, प्रभाष कसादे,शिवाजीराव भालेराव, बालाजी वाघमारे, शेख जाबेर,अनिल वाघमारे, बालाजी वाघमारे, शेख कलिमभाई,शेख जहांगीर, दिनेश तिगोटे,डाॅ.संजय वाघंबर,किरणकुमार कांबळे,चंद्रकांत कांबळे,शेख मतीनभाई आदींनी पुढाकार घेतला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0