२५ बेवारस मोटारसायकलींची शनिवारी लिलाव
२५ बेवारस मोटारसायकलींची शनिवारी लिलाव
लातूर येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारातील
२५ बेवारस मोटारसायकलींची शनिवारी लिलाव
लातूर, दि. १० : येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस स्थितीत असलेल्या २५ मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्यासाठी लातूरचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. या २५ बेवारस मोटारसायकलींचा लिलाव १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
इच्छुक खरेदीदारांनी १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे उपस्थित राहावे. ५० हजार रुपयांची अनामत रक्कम, परवान्याची प्रत आणि २०० रुपये किमतीचे बॉन्ड सोबत आणावेत, असे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.
*****
लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यातील
23 बेवारस मोटारसायकलींचा 12 एप्रिलला लिलाव
लातूर, दि. 10 (जिमाका): लातूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात बेवारस असलेल्या एकूण 23 मोटारसायकलींचा लिलाव शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी लिलावात सहभागी होण्यासाठी गांधी चौक पोलीस ठाण्यात अनामत रक्कम आणि परवाना घेऊन उपस्थित राहावे.
यापूर्वीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेल्या 50 मोटारसायकली व्यतिरिक्त गांधी चौक पोलीस स्टेशन येथील आणखी 23 मोटारसायकलींचा जाहीर लिलाव शनिवारी होणार असून या लिलावासाठी लातूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली आहे, अशी माहिती गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.
*****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
सप्ताह अंतर्गत मार्जिन मनी कार्यशाळेला प्रतिसाद
लातूर, दि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार लातूर येथील वैशाली बुद्ध विहार येथे मार्जिन मनी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून, तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचनाने कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना मार्जिन मनी योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी, तसेच वैशाली बुद्ध विहारचे सचिव केशव कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. परिसरातील युवक-युवतींनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
*****
सामाजिक समता सप्ताहांतर्गत
लातूर येथे १२ एप्रिल रोजी महिला मेळावा
लातूर, दि. १० : राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने समाज कल्याण विभागामार्फत ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी माहिती देणारे दयानंद महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विभाग प्रमुख श्रीमती मनिषा अष्टेकर यांचे व्याख्यान होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
*****
विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज
साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद
·11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’ उपक्रम
·जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
·महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत नागरिकांशी संवाद
लातूर दि. 10 : मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा ‘संवाद मराठवाडयाशी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ येत्या 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या उपक्रमाची सुरूवात झाली आणि संपूर्ण प्रशासन थेट गावात पोचले. या उपक्रमाच्या यशानंतर विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत विभागीय आयुक्त श्री गावडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत संवाद साधणार आहेत. श्री. गावडे यांच्यासमवेत यावेळी विभागीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असणार आहेत. प्रत्येक आठवडयात दर बुधवारी 4 ते 6 यावेळेत आयुक्त नागरिकांशी संवाद साधतील. प्रत्येक संवादावेळी प्रशासकीय विभाग व विषय ठरविण्यात येणार असून यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित विषयावर विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
नागरिकांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधता येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले आहे. याबाबतचा क्युआर कोडही प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0